मुंबई : महाराष्ट्र सरकार पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करत नसल्यानं सीमेवरील नागरिक आता शेजारच्या राज्यांतील पेट्रोल पंपावर जाऊन इंधन भरू लागलेत. कारण पेट्रोल, डिझेलच्या किंमती केंद्रानं 5 आणि 10 रुपयांनी कमी केल्यानंतर काही राज्यांनीही कर कमी केले आणि त्यामुळे या राज्यांत दर आणखी कमी झालेत. महाराष्ट्राच्या शेजारच्या चार राज्यांनी कर कमी केल्यानंतर सीमेजवळच्या पेट्रोल पंपावर जाऊन लोक पेट्रोल आणि डिझेल भरतायत. त्यामुळे सीमेजवळच्या पेट्रोल पंपावरील इंधनाची विक्री 50 टक्क्यांनी वाढलीय.
- महाराष्ट्राच्या सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 109 रूपये 73 पैसे एवढा आहे. तर कर्नाटकमध्ये हाच दर 100 रुपये 76 पैसे आहे. म्हणजे कर्नाटकात महाराष्ट्रापेक्षा 9 रुपये कमी आहे. डिझेलचा दर 92 रूपये 54 पैसे आहे तर कर्नाटकामध्ये हाच दर 85 रुपये 20 पैसे आहे. म्हणजे 7 रुपयांना कमी आहे.
- सिंधुदुर्गात पेट्रोलचा दर 111 रूपये 89 पैसे तर गोव्यामध्ये पेट्रोलचा दर 84 रुपये 80 पैसे म्हणजे गोव्यात पेट्रोल तब्बल 25 रुपये स्वस्त आहे. डिझेलचा दर 94 रुपये 63 पैसे तर गोव्यामध्ये डिझेलचा दर 81 रूपये 20 पैसे म्हणजे डिझेल तब्बल 12 रुपयांनी स्वस्त झाले आहे.
- नांदेडमध्ये पेट्रोलचा 112 रूपये 41 पैसे इतका दर तर शेजारच्या तेलंगणामध्ये पेट्रोलचा दर 110 रूपये 6 पैसे आहे. म्हणजे पेट्रोल दोन रुपयांनी कमी झाले आहे. डिझेलचा दर 95 रूपये 11 पैसे आहेय तर शेजारच्या तेलंगणामध्ये डिझेलचा दर 96 रूपये 17 पैसे आहे. म्हणजे महाराष्ट्रात एक रुपयांनी स्वस्त झाले आहे.
- गोंदियामध्ये पेट्रोलचा दर 111 रूपये 36 पैसे इतका आहे. तर शेजारच्या छत्तीसगडमध्ये इतका 102 रूपये 50 पैसे आहे. म्हणजे 9 रुपयांनी स्वस्त झाले आहे. डिझेलचा दर 94 रूपये 12 पैसे इतका आहे. तर शेजारच्या छत्तीसगडमध्ये डिझेलचा 94 रुपये 40 दर इतका आहे. म्हणजे जवळपास सारखाच आहे.
- अमरावतीमध्ये पेट्रोलचा दर 111 रूपये 49 पैसे इतका आहे तर शेजारच्या मध्यप्रदेशात पेट्रोलचा दर 108 रूपये 64 पैसे इतका आहे म्हणजे तीन रुपयांनी कमी झाला आहे. डिझेलचा दर 95 रूपये 69 पैसे इतका आहे. तर शेजारच्या मध्यप्रदेशात डिझेलचा दर 92 रूपये 17 पैसे इतका आहे . म्हणजे तीन रुपये कमी झाला आहे.
- नंदुरबारमध्ये पेट्रोलचा दर 110 रुपये 77 पैसे इतका आहे. तर शेजारच्या गुजरातमध्ये हाच दर इतका 98 रुपये 40 पैसे आहे. म्हणजे तब्बल 12 रुपये स्वस्त आहे. डिझेलचा दर 93 रुपये 53 पैसे इतका आहे. तर शेजारच्या गुजरातमध्ये डिझेलचा दर 90 रुपये 30 पैसे इतका आहे . म्हणजे तीन रुपयांनी स्वस्त झाले आहे.
- पालघरमध्ये लिटरमागे पेट्रोलचा दर 110 रुपये 35 पैसे इतका आहे तर शेजारच्या सिल्वासामध्ये 93 रुपये 8 पैसे इतका आहे. तब्बल 17 रुपयांनी पेट्रोल स्वस्त आहे. डिझेलचा दर 93 रुपये 8 पैसे इतका आहे. तर शेजारच्या सिल्वासामधे डिझेलचा दर 86 रूपये 96 पैसे इतका आहे. म्हणजे 7 रुपयांनी स्वस्त आहे.
सीमेपलिकडे जाऊन ग्राहकांची चांदी होत असली तरी महाराष्ट्रातल्या सीमेवरच्या पेट्रोलपंप चालकांचं मात्र दिवाळं निघालं आहे इंधन आणि मद्य या दोन उत्पादनावर मिळणाऱ्या करावरच सध्या राज्य सरकारांची भिस्त आहे. कोरोनाच्या काळात राज्याचं उत्पन्न घटलंय हे खरं असले तरी जीएसटीचा परतावा केंद्राकडून मिळत नाही, अशीही ओरड आहे. मग केंद्र आणि राज्यातल्या भांडणामध्ये सामान्य जनतेनं का भरडून घ्यायचं? हा सवाल उपस्थित होत आहे.
संबंधित बातम्या :
Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे दर आजही स्थिर, महाराष्ट्रासह 14 राज्यात अद्याप व्हॅट कपात नाही
Petrol Diesel price : आनंद काही काळच टिकणार, पेट्रोल-डिझेल पुन्हा भडकणार, तज्ज्ञांचा नेमका अंदाज काय?