Petrol-Diesel Price Today 06th November, 2021, iocl.com : ऐन दिवाळीत पेट्रोलवर 5 रुपये प्रति लिटर, तर डिझेलवर 10 रुपयांची कर कपात करत केंद्र सरकारनं सर्वसामान्यांना दिलासा दिला. त्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी घट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अशातच आजही सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळालेला आहे. लागोपाठ  दुसऱ्या देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर असून कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज मुंबईत पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत  94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे. तर देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत 103.97 रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत  86.67 रुपये प्रति लिटर इतकी आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी उच्चांक गाठला आहे. दिवाळीपूर्वी सलग सात दिवसांपर्यंत इंधनाच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली होती. दरम्यान, त्यानंतर केंद्र सरकार आणि काही राज्य सरकारांनी जनतेला दिलासा देत उत्पादन शुल्क आणि करात कपात केली होती. पेट्रोलियम कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) नं दिलेल्या माहितीनुसार, देशभरात पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे आज देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत.  

देशातील महानगरांतील दर काय?

देशातील महत्त्वाची शहरं पेट्रोल रुपये/लिटर डिझेल रुपये/लिटर
मुंबई 109.98 94.14
दिल्ली 109.69 98.24
कोलकाता 104.67 89.79
चेन्नई 101.40 91.43

केंद्राच्या कपातीनंतर काही राज्यांकडूनही व्हॅट कपातीचा निर्णय
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे पाच आणि दहा रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला. राज्यांनीही त्यांच्या व्हॅट करात कपात करण्याचं आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आलं आहे. याला प्रतिसाद देत तात्काळ 22 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अतिरिक्त कपात करण्याचा निर्णय घेतला. गोव्यासह उत्तरप्रदेश, मणिपूर, कर्नाटक, उत्तराखंड अशा 22 राज्यांनीही अतिरिक्त व्हॅट कपात केली आहे. 

14 राज्य आपल्या मतांवर ठाम -
पेट्रोल डिझेलच्या किमतीवरुन केंद्राच्या विरोधात महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं होतं. आता केंद्रानं कपातीचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी वॅट कपात कधी करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महाराष्ट्रासह 14 राज्य आपल्या मतावर अद्याप ठाम आहेत. या राज्यात अद्याप कर कपात करण्यात आलेली नाही. राजस्थान, पंजाब, छत्तीसगढ़, दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबार, ओडिसा, झारखंड, केरळ, मेघालय, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगाना या राज्यांचा समावेश आहे. 

पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

गेल्या 26 दिवसांत 8.15 रुपयांनी महागलं होतं पेट्रोल  
गेल्या सप्टेंबर महिन्यात 28 तारखेला पेट्रोलचे 20 पैशांनी महागलं होतं. तर डिझेल 25 पैसे प्रति लिटरनं महागलं होतं. दरम्यान, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पेट्रोलच्या किमतींमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली. तर गेल्या मंगळवारपर्यंत हे दरवाढीचं सत्र सुरुच राहिलं. मधे काही दिवस या दरवाढीला स्थिरता मिळाली. तसेच गेल्या 26 दिवसांत पेट्रोलची किंमत 8.15 रुपये प्रति लिटरनं महागलं होतं. 

29 दिवसांत 9.45 रुपयानं महागलं डिझेल 
गेल्या महिन्यात पेट्रोलच्या तुलनेत डिझेलच्या दरांत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. तसं पाहिलं तर पेट्रोलच्या तुलनेत डिझेल तयार करणं अधिक खर्चिक आहे. पण भारताच्या खुल्या बाजारात पेट्रोल महाग आणि डिझेल स्वस्त विकलं जाते. गेल्या 24 सप्टेंबरपासून डिझेलच्या दरांत वाढ होण्यास सुरुवात झाली होती. ही दरवाढ गेल्या आठवड्यात मंगळवारी येऊन थांबली होती. यावेळी पेट्रोलच्या तुलनेत डिझेलच्या दरांत मोठी वाढ झाली होती. गेल्या 29 दिवसांत ते 9.35 रुपये प्रति लिटर महागलं आहे.