Hingoli News : हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात कृषी महाविद्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी कृषीमंत्री दादाजी भुसे आले होते. या सोहळ्यात दादाजी भुसे यांचे भाषण सुरु असताना मोठ्या प्रमाणात हवा आली आणि त्यामुळे स्टेजच्या डाव्या बाजूला असलेला मंडप कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने त्या मंडपाखाली कोणीही नागरिक नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. भाषणादरम्यान मंडप उडाल्याने नागरिक घाबरले होते. परंतू कृषीमंत्र्यांनी आवाहन केल्याने नागरिकांनी गदारोळ थांबवला.
नेमकं घडलं काय
राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे हे आज हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान दादा भुसे कृषी महाविद्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी शेतकरी महिलांशी संवाद साधत होते. यादरम्यान मोठ्या प्रमाणावर हवा आली आणि या हवेत स्टेजच्या डाव्या बाजूला असलेला मंडप कोसळला. सुदैवाने मंडपात नागरिक नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मंडप कोसळला मात्र, सुदैवाने या मंडपात एकही नागरिक नव्हता. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
दरम्यान, हवा मोठ्या प्रमाणात असल्याने ज्या मंडपात कार्यक्रम सुरु होता तो मंडप सुद्धा कोसळतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. कार्यक्रमात बसलेल्या महिला शेतकरी घाबरल्या होत्या. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत भाषण सुरु असतानाच दादा भुसे यांनी सर्वांना आश्वासित केले की हा मंडप पडणार नाही. हवा निघून गेली आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करु नका. त्यानंतर मंडपात बसलेल्या महिलांनी आणि नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. परंतु स्टेजच्या डाव्या बाजूला कोसळलेल्या मंडपात जर नागरिक बसलेले असते तर मोठा अनर्थ झाला असता.
आज दादाजी भुसे यांनी औंढा शहरालगत असलेल्या जिंतूर पॉईंटवर विकेल ते पिकेल या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर दादा भुसे गोळेगाव येथील कृषी महाविद्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी पोहोचले होते. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला शेतकरी उपस्थित असल्याने या कृषी महाविद्यालयाचे उद्घाटन दादा भुसे यांनी एका महिला शेतकऱ्यांच्या हस्ते केले.
महत्त्वाच्या बातम्या:
- Dadaji Bhuse : कृषीमंत्र्यांनी गाड्याचा ताफा थांबवत शेतकऱ्यांशी साधला संवाद, शेतमाल स्वतः च विकण्याचं केलं आवाहन
- Raju Shetti : ज्यांनी 800 शेतकऱ्यांचे बळी घेतले त्यांच्यासोबत कसे जाणार, राजू शेट्टींचा केंद्रासह राज्य सरकारवर निशाणा