Devendra Fadnavis : भाजपच्या पोलखोल रथाच्या यात्रेवर कितीही हल्ले केले तरी पोलखोल थांबणार नसल्याचे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. पोलिसांनी जर संरक्षण दिले नाही तर त्यांची देखील पोलखोल करणार असल्याचा इशारा फडणवीस यांनी दिला. दरम्यान, अमरावती जिल्ह्यात इंग्रजांच्या राज्यासारखे पोलिसांचे राज्य आहे. याठिकाणी हिंदू समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिसांनी जात, धर्म न पाहता कारवाई करावी असेही फडणवीस यावेळी म्हणाले.


नागपूरला आल्यामुळे संजय राऊतांना सुबुद्धी येईल


शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या नागपूर दौऱ्याबद्दल देवंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी फडणवीस म्हणाले की, संजय राऊत वारंवार नागपूरला आल्यामुळे त्यांना सुबुद्धी येईल असा टोला फडणवीसांनी राऊतांना लगावला. नागपुरच्या मातीमध्ये, वातावरणामध्ये एक वेगळेपण असल्याचे ते म्हणाले.  


पोलखोल आम्ही रोजच करत आहोत. ज्यांची रोज पोलखोल होत आहे, ते अस्वस्थ होऊन आमच्या रथावर हल्ले करत आहेत. कितीही हल्ले केले तरी पोलखोल थांबणार नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले. अमरावतीत इंग्रजांचे राज्य चालायचं तसं पोलिसांचे राज्य चालले आहे. त्या ठिकाणी लांगूलचालन सरकारचे मंत्री करत आहेत. त्यातून परिस्थिती आणखी वाईट होत आहे. या लांगूलचालनमुळे दोन समाज एकमेकांपुढे उभे ठाकतायेत.  त्यामुळे आज जी परिस्थिती आहे. तिथे हिंदू समाजाला टार्गेट करण्याचे काम सुरु आहे, म्हणून तणाव वाढतोय. पोलिसांनी हे थाबंवावं असेही फडणवीस म्हणाले.


पोलिसांच्या बदल्यांवर फडणवीस म्हणाले...


पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश परत घेण्याचं काय कारण आहे, हे समजलं पाहिजे. प्रशासकीय चुक झाली, की मागच्या वेळेस 10 डिपींचे बदली आदेश थांबवले. नंतरच्या बदली घोटाळा सीबीआयच्या स्कॅनरमध्ये आहे. बदली घोटाळ्यात ते आलं, आताही तसाच काही प्रकार आहे का? हे समजलं पाहिजे असे फडणवीस म्हणाले.


2019 च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्यासोबत होते तेव्हा त्यांचे बोल गुलुगुलु वाटत होते. गुदगुल्या होत होत्या. आता राज ठाकरे सत्य बोलालयला लागले तर त्यांना खाजवायला होतंय. राज ठाकरे यांचा घाव वर्मी लागत असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. भारतीय जनता पार्टीला कोणालाही समोर करायची गरज नाही असे ते म्हणाले. आम्ही दररोज पोलखोल करतोय, त्यामुळं सरकार आणि सरकारमधील पक्ष व्यथित झाले आहेत. त्यामुळे आमच्या पोलखोल यात्रेवर हल्ले केले जात आहेत. पण आम्ही घाबरणार नाही असेही फडणवीस यांनी सांगितले.
 


महत्त्वाच्या बातम्या: