Raju Shetti : ज्यांनी 800 शेतकऱ्यांचे बळी घेवून कृषी कायदे मागे घेतले. ज्यांच्यामुळे रासायनिक खतांच्या किंमती वाढल्या, त्यांच्यासोबत कसं जाणार असे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केले. तुम्ही भाजपसोबत जाणार का? असा प्रश्न विचारला असता शेट्टींनी याबाबत वक्तव्य केलं. बारामतीत आयोजीत करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शेट्टी बोलत होते. तसेच यावेळी शेट्टी यांनी महाविकास आघाडीवर देखील निशाणा साधला. महाविकास आघाडीने भूमीग्रहण कायद्यात मोडतोड केली. त्याबद्दल उत्तर द्यावं. हे शेतकऱ्यांच्या हिताचं धोरण आहे का? एफआरपीचे तुकडे, विजेचा लपंडाव, अतिवृष्टीतील तुटपुंजी मदत हे शेतकऱ्यांच्या हिताचं धोरण आहे का? असे सवाल राजू शेट्टी यांनी यावेळी उपस्थित केले.


सध्या राज्यातील शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा ऊस गाळपाविना शिल्लक आहे. महापूरग्रस्तांना तोकडी मदत, एफआरपीचे तुकडे करुन शेतकऱ्यांचं नुकसान केलं आहे. विजेचा लपंडाव सुरु आहे. अनेक शेतकऱ्यांचा बळी गेला आहे. शिरोळमध्ये जी दुर्घटना घडली त्यामध्ये माझा वर्गमित्र सुहास याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे शेट्टी म्हणाले. केंद्र सरकारच्या धोरणामुळे रासायनिक खतांचे दर वाढले आहेत. इंधन दर वाढल्यामुळं मशागतीचा खर्च देखील वाढल्याचे शेट्टींनी सांगितले.


या ऊस उत्पादकांमुळेच शरद पवार यांचा पुतण्या आणि नातवांचे कारखाने झाले असल्याचे शेट्टी म्हणाले. दरम्यान, 11 फेब्रुवारीला शरद पवार यांना पत्र लिहिलं होतं. विविध प्रश्न मांडले होते. सरकारच्या धोरणाबद्दल आक्षेप नोंदवला होता. सोनिया गांधी आणि राहुल गांधींनाही पत्र लिहिलं होतं. शेतकऱ्यांबद्दल अन्यायकारक निर्णय घेतले. सर्वांकडून कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे कार्यकारिणीशी बोलून मी महाविकास आघाडीतून बाजूला व्हायचा निर्णय घेतल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.
 
कोरोना काळात शिक्षणाचा बट्ट्याबोळ


टनामागे 214 रुपयांचा खर्च वाढला आहे. उसाचा दर परवडत नाही. रोजगाराचे प्रश्न निर्माण झाले आहेत. अनेकांना महाविद्यालयीन शिक्षण सोडावं लागलं. आरोग्य, म्हाडा पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचे शेट्टी म्हणाले. कोरोना काळात शिक्षणाचा बट्ट्याबोल झाला असल्याचे शेट्टी म्हणाले. विरोधक ईडी, इनकम टॅक्स आणि भोंग्याच्या पुढे जायला तयार नाहीत. सत्ताधारी मशगुल आहेत. केंद्रातल्या अपयशावर विरोधक गप्प आहेत. तर राज्यातल्या प्रश्नावर इथले विरोधक गप्प आहेत. आळीमिळी गुपचिळी अशी अवस्था असून, त्यासाठी दोन अडीच महिने हुंकार आंदोलन करत आहेत. त्याचा परिणाम विद्रोहात होईल असेही शेट्टी यावेळी म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या: