एक्स्प्लोर

गडचिरोलीत दुर्घटना, प्रवासी नाव बुडाली, काही जण बेपत्ता असल्याची माहिती

एक प्रवासी नाव बुडाल्याने झालेल्या दुर्घटनेत दोन महिला बेपत्ता असल्याची माहिती आहे. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरील सिरोंचा तालुक्यात असलेल्या इंद्रावती नदीवर ही घटना घडली आहे.

गडचिरोली: गडचिरोलीत एक मोठी दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. एक प्रवासी नाव बुडाल्याने दोन जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरील सिरोंचा तालुक्यात असलेल्या इंद्रावती नदीवर ही घटना घडली असल्याची माहिती आहे. नावेत प्रवास करत असलेले तेरा जण सुरक्षित बाहेर पडले आहेत तर दोन महिला बेपत्ता असल्याची माहिती आहे. हा भाग दुर्गम असल्याने अद्याप या घटनेबद्दल सविस्तर माहिती समजू शकलेली नाही.

प्राथमिक माहितीनुसार सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली येथून हे लोक छत्तीसगड राज्यात एका कार्यक्रमासाठी दोन लहान नावेने गेले होते. कार्यक्रम आटोपून परत येताना ही दुर्घटना झाली आहे. सायंकाळी सात ते आठ वाजेच्या दरम्यान घटना घडली. घटना महाराष्ट्र छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील दुर्गम नक्षलग्रस्त भागात घडल्याने प्रशासनाला उशिरा माहिती मिळाली. शोधमोहिमेत वन विभाग आणि पोलीसांची टीम दाखल झाली आहे. शोधमोहिम युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती आहे.

माहितीनुसार, नावेत एकूण 15 प्रवासी करत प्रवास करत होते. त्यापैकी 13 प्रवासी आपला जीव वाचवत बाहेर पडण्यात यशस्वी झाले मात्र  2 महिला अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती पुढे येत आहे.  या दोन नावेत एकूण 15 प्रवासी प्रवास करत होते असून त्यापैकी 6 पुरुष तर 9 महिलांचा होता समावेश होता.  कांता सत्यम येलाम व शांता शिवय्या गावडे अशी बेपत्ता असलेल्या दोन महिलांची नावं आहेत.

काल हे सगळे लोक छत्तीसगढ राज्यात तेराव्याच्या कार्यक्रमाकरता गेले होते. परत येताना नावेला दगड लागल्याने नाव पटली झाली असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली आहे. दोन्ही नाव एकत्र बांधून प्रवास करत होते, त्यामुळे दोन्ही नाव एकत्र बुडाल्या. घटनेला 12 तास उलटूनही अद्यापही त्या दोन महिलांचा शोध न लागलेला नाही. घटनास्थळी पोलीस विभाग, महसूल विभागाचे आपत्ती व्यवस्थापन टीम आणि वन विभागाच्या टीम कडून शोधमोहिम युद्ध पातळीवर सुरू आहे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : 'भाजपसह गद्दार गटाचा पराभव करणार', संजय राऊतांनी सांगितलं मविआच्या जागा वाटपाचं सूत्र, म्हणाले...
'भाजपसह गद्दार गटाचा पराभव करणार', संजय राऊतांनी सांगितलं मविआच्या जागा वाटपाचं सूत्र, म्हणाले...
Ajit Pawar: अल्पवयीन आरोपींचं वय १८ वरून आता १४ करण्याचा विचार; अजित पवारांचं मोठं वक्तव्य, अमित शाहांशी देखील करणार चर्चा
अल्पवयीन आरोपींचं वय १८ वरून आता १४ करण्याचा विचार; अजित पवारांचं मोठं वक्तव्य, अमित शाहांशी देखील करणार चर्चा
Nitesh Rane : नितेश राणेंच्या अडचणीत वाढ? जळगाव न्यायालयात फौजदारी खटला, आज सुनावणी, नेमकं काय आहे प्रकरण?
नितेश राणेंच्या अडचणीत वाढ? जळगाव न्यायालयात फौजदारी खटला, आज सुनावणी, नेमकं काय आहे प्रकरण?
Stock Market : सेन्सेक्स 1 हजार 264 अंकांनी कोसळला तर निफ्टीत 344 अंकांची घसरण 
Stock Market : सेन्सेक्स 1 हजार 264 अंकांनी कोसळला तर निफ्टीत 344 अंकांची घसरण 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : पंतप्रधान, गृहमंत्री देश वाऱ्यावर सोडून गल्लीबोळात फिरतात, राऊतांचा टोलाMPSC Exam : एमपीएससी परीक्षेत गैरप्रकार केल्यास 5 वर्षांपर्यंत कारावासDr. Meera Narvekar Interview : ChatGPT ते आधुनिक आव्हानं, डॉ. मीरा नार्वेकर यांची विशेष मुलाखतABP Majha Headlines : 9 AM  : 3 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : 'भाजपसह गद्दार गटाचा पराभव करणार', संजय राऊतांनी सांगितलं मविआच्या जागा वाटपाचं सूत्र, म्हणाले...
'भाजपसह गद्दार गटाचा पराभव करणार', संजय राऊतांनी सांगितलं मविआच्या जागा वाटपाचं सूत्र, म्हणाले...
Ajit Pawar: अल्पवयीन आरोपींचं वय १८ वरून आता १४ करण्याचा विचार; अजित पवारांचं मोठं वक्तव्य, अमित शाहांशी देखील करणार चर्चा
अल्पवयीन आरोपींचं वय १८ वरून आता १४ करण्याचा विचार; अजित पवारांचं मोठं वक्तव्य, अमित शाहांशी देखील करणार चर्चा
Nitesh Rane : नितेश राणेंच्या अडचणीत वाढ? जळगाव न्यायालयात फौजदारी खटला, आज सुनावणी, नेमकं काय आहे प्रकरण?
नितेश राणेंच्या अडचणीत वाढ? जळगाव न्यायालयात फौजदारी खटला, आज सुनावणी, नेमकं काय आहे प्रकरण?
Stock Market : सेन्सेक्स 1 हजार 264 अंकांनी कोसळला तर निफ्टीत 344 अंकांची घसरण 
Stock Market : सेन्सेक्स 1 हजार 264 अंकांनी कोसळला तर निफ्टीत 344 अंकांची घसरण 
Ajit Pawar: गुन्हे रोखण्यासाठी अजित पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये! भल्या पहाटे पोलिसांसोबत बैठक, घेतला मोठा निर्णय
गुन्हे रोखण्यासाठी अजित पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये! भल्या पहाटे पोलिसांसोबत बैठक, घेतला मोठा निर्णय
ऊस दराची स्पर्धा ठरवणार माढा विधानसभेचा आमदार?  दिग्गज साखर कारखानदार आमने-सामने, काय आहेत समीकरणं?
ऊस दराची स्पर्धा ठरवणार माढा विधानसभेचा आमदार?  दिग्गज साखर कारखानदार आमने-सामने, काय आहेत समीकरणं?
आमदार खासदारांना मराठा समाजाची भीती, पण  50 टक्के OBC समाजाची भीती वाटत नाही, हाकेंचा हल्लाबोल
आमदार खासदारांना मराठा समाजाची भीती, पण  50 टक्के OBC समाजाची भीती वाटत नाही, हाकेंचा हल्लाबोल
Washim Crime News : क्षुल्लक कारण अन् वाद विकोपाला... वाशिममध्ये 13 जणांनी युवकाला केलेल्या बेदम मारहाणीत मृत्यू,नेमकं काय घडलं?
क्षुल्लक कारण अन् वाद विकोपाला... वाशिममध्ये 13 जणांनी युवकाला केलेल्या बेदम मारहाणीत मृत्यू,नेमकं काय घडलं?
Embed widget