एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पूरग्रस्तांना लालबागच्या मंडळाकडून 25 लाखांची मदत तर पश्चिम महाराष्ट्र देवस्थानकडून 5 कोटींची मदत
पूरग्रस्तांना देवस्थानांकडून मदतीचा ओघ सुरुचं असताना आता लालबागच्या मंडळा आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थानकडून मदत जाहीर करण्यात आली आहे.
मंबई : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्याकडून राज्यातील पूरग्रस्तांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. यावेळी राज्यातील पूरपरिस्थितीची जाण ठेवून या पूरग्रस्तांना मदत करण्यात येत आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून पूरग्रस्तांना पाच कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच भाविकांनी अंबाबाईला नेसवलेल्या पाच हजार साड्याही महिलांना देण्यात येणार आहेत. शिवाय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्याचीही वेगळी तरतूद करण्यात येणार असल्याचे समितीने सांगितलं आहे. देवस्थान समितीचे कर्मचारी एक दिवसांचा पगार देखील पूरग्रस्तांसाठी देणार आहेत.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पूरग्रस्तांसाठी 25 लाखांची मदत दिली आहे. मुख्यमंत्री निधीत ही रक्कम जमा करण्यात आली. तसेच, 'लालबागचा राजा'चे मंडळ रायगडमधील जुई गावच्या धर्तीवर एक संपूर्ण गाव दत्तक घेऊन त्या गावाचे पुनर्वसन करणार आहे.
गेल्या आठ दिवसांपासून सांगली, कोल्हापूर परिसरात महापूरानं थैमान घातलं आहे. लाखो लोकांना या महापुरामुळे विस्थापित व्हावं लागलं आहे. या महापुरामुळे करोडो रुपयांचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे यंदा या मंडळांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रीडा
Advertisement