एक्स्प्लोर

नियम मोडून जळगावात धूमधडाक्यात लग्न; मनपाकडून 50 हजारांचा दंड, वधू-वराच्या मातापित्यांवर गुन्हा

लोकांच्या उपस्थितीचं बंधन असतानाही जळगावात धूमधडाक्यात लग्न पार पडलं. यानंतर महापालिकेने कारवाई करत 50 हजारांच्या दंड ठोठावला आणि वधू-वराच्या मातापित्यावर गुन्हा दाखल केला.

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्न समारंभ अतिशय मर्यादित स्वरुपात करण्याचे शासनाचे निर्देश असतानाही जळगावात धूमधडाक्यात लग्न पार पडलं. याविरोधात महापालिकेने कारवाई करत 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला. शिवाय वधू-वराच्या मातापित्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर दंड ठोठावण्याची राज्यातील ही पहिलीच कारवाई असल्याचं समजतं.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक लोकांचे बळी जात असताना शासन निर्णयाचे काटेकोर पालन करीत धूमधडाक्यात विवाह समारंभ टाळणे अपेक्षित आहे. मात्र शासन निर्णय पायदळी तुडवत धूमधडाक्यात विवाह करणं जळगावातील वर-वधूच्या मातापित्याला चांगलेच महागात पडले आहे. जळगाव शहरातील योगेश्वरनगर परिसरात भागवत चौधरी आणि धरण गाव येथील राजेंद्र चौधरी यांच्या मुलगा आणि मुलीचा विवाह संपन्न झाला. या विवाह समारंभ ठिकाणी महापालिकेने छापा मारला असता, 150 ते 200 जण विनामास्क आणि गर्दी करुन असल्याचं दिसून आलं. यानंतर मनपाच्या पथकाने कारवाई करत वर आणि वधू पित्याला 50 हजार रुपयांचा दंड करण्यासोबतच आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

कोरोनाचा वाढता प्रसार पाहता त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी यापुढेही शासन नियमाचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात कारवाई करणार असल्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.

लग्न समारंभासाठी नियम कोणते?
राज्यात 22 एप्रिल रात्री आठपासून 'ब्रेक द चेन' अंतर्गत अधिक कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. प्रशासनाने जाहीर केलेल्या  सुधारित नियमावलीत लग्न सोहळ्यांसाठीही नवे निर्बंध जारी केले आहेत. नव्या नियमावलीनुसार, लग्न सोहळ्यांना केवळ 25 जणांनाच उपस्थित राहण्याची परवानगी असणार आहे. एवढंच नाहीतर विवाह सोहळा केवळ दोन तासांत आटपावा लागणार आहे. तसेच लग्नसोहळ्यांसाठी जारी करण्यात आलेल्या नियमांपैकी कोणत्याही नियमांचं जर उल्लंघन झालं तर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या किंवा नियमांचा भंग करणाऱ्या कुटुंबांना पन्नास हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल. तर संबंधित कार्यालय किंवा समारंभस्थळावरही कारवाई करण्यात येणार आहे. कार्यालयानं नियमभंग केल्यास कोरोना आपत्ती असेपर्यंत कार्यालय बंद करण्यात येईल. दरम्यान, आधी लग्नसोहळ्यांसाठी 50 जणांच्या उपस्थितीची मर्यादा होती. पण आता कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केवळ 25 जणांच्या उपस्थितीच लग्नसोहळा उरकावा लागणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ह्रदयद्रावक.. वीजेच्या धक्क्याने तिघांचा मृत्यू, पती-पत्नीसह चिमुकला ठार, सुदैवाने बचावली मुलगी
ह्रदयद्रावक.. वीजेच्या धक्क्याने तिघांचा मृत्यू, पती-पत्नीसह चिमुकला ठार, सुदैवाने बचावली मुलगी
Beed Lok Sabha: लोकांनी माझ्यासाठी प्राण दिल्याने अपराधी वाटतं, या सगळ्या गोष्टींमुळे मी प्रचंड डगमगलेय: पंकजा मुंडे
लोकांनी माझ्यासाठी प्राण दिल्याने अपराधी वाटतं, या सगळ्या गोष्टींमुळे मी प्रचंड डगमगलेय: पंकजा मुंडे
Kolhapur Police Recruitment : कोल्हापूर पोलिस दलातील भरतीचा मुहूर्त ठरला; अशी होणार भरती प्रक्रिया
कोल्हापूर पोलिस दलातील भरतीचा मुहूर्त ठरला; अशी होणार भरती प्रक्रिया
दोन वर्षांपासून प्रलंबित पुलाचे अर्धवट बांधकाम ठरतोय मृत्यूचा सापळा; खड्डयात पडून आणखी एका बालकाचा दुर्दैवी मृत्यू
दोन वर्षांपासून प्रलंबित पुलाचे अर्धवट बांधकाम ठरतोय मृत्यूचा सापळा; खड्डयात पडून आणखी एका बालकाचा दुर्दैवी मृत्यू
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Maharashtra SuperFast :राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट  17 जून 2024 ABP MajhaAmol Kirtikar On EVM : फोनची अदलाबदल, मतांची फेरफार, गंभीर आरोप; अमोल कीर्तिकर ExclusiveAaditya Thackeray:विजयी घोषित करुनही किर्तीकर हरले कसे? ठाकरे गटाने 19 ते 23 व्या फेरीचं गणित मांडलंNaredra Modi Vs Chandrababu : मोदींची साथ नितिश, चंद्राबाबू सोडतील? राऊतांचं भाकित खरं होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ह्रदयद्रावक.. वीजेच्या धक्क्याने तिघांचा मृत्यू, पती-पत्नीसह चिमुकला ठार, सुदैवाने बचावली मुलगी
ह्रदयद्रावक.. वीजेच्या धक्क्याने तिघांचा मृत्यू, पती-पत्नीसह चिमुकला ठार, सुदैवाने बचावली मुलगी
Beed Lok Sabha: लोकांनी माझ्यासाठी प्राण दिल्याने अपराधी वाटतं, या सगळ्या गोष्टींमुळे मी प्रचंड डगमगलेय: पंकजा मुंडे
लोकांनी माझ्यासाठी प्राण दिल्याने अपराधी वाटतं, या सगळ्या गोष्टींमुळे मी प्रचंड डगमगलेय: पंकजा मुंडे
Kolhapur Police Recruitment : कोल्हापूर पोलिस दलातील भरतीचा मुहूर्त ठरला; अशी होणार भरती प्रक्रिया
कोल्हापूर पोलिस दलातील भरतीचा मुहूर्त ठरला; अशी होणार भरती प्रक्रिया
दोन वर्षांपासून प्रलंबित पुलाचे अर्धवट बांधकाम ठरतोय मृत्यूचा सापळा; खड्डयात पडून आणखी एका बालकाचा दुर्दैवी मृत्यू
दोन वर्षांपासून प्रलंबित पुलाचे अर्धवट बांधकाम ठरतोय मृत्यूचा सापळा; खड्डयात पडून आणखी एका बालकाचा दुर्दैवी मृत्यू
Telly Masala : 'चंदू चॅम्पियन' मधील गाण्याला मराठी अभिनेत्याचा आवाज ते ‘महाराष्ट्राची क्रश’ आता हिंदी वेब सीरिजमध्ये झळकणार; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
'चंदू चॅम्पियन' मधील गाण्याला मराठी अभिनेत्याचा आवाज ते ‘महाराष्ट्राची क्रश’ आता हिंदी वेब सीरिजमध्ये झळकणार; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
T20 WC 2024: रिषभ पंत नव्हे दुसऱ्या खेळाडूच्या जागी संजू सॅमसनला संधी द्या, भारताच्या टी 20 वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूचा सल्ला  
रिषभ पंत नव्हे दुसऱ्या खेळाडूच्या जागी संजूला संधी द्या, भारताच्या माजी क्रिकेटरचा सुपर 8 पूर्वी सल्ला 
Chhagan Bhujbal : समता परिषदेच्या बैठकीतून छगन भुजबळांचा ओबीसी आंदोलकांना कॉल, पाठीशी असल्याची दिली गॅरंटी!
समता परिषदेच्या बैठकीतून छगन भुजबळांचा ओबीसी आंदोलकांना कॉल, पाठीशी असल्याची दिली गॅरंटी!
Rinku Rajguru : आर्चीसोबत लग्न करायचे आहे? रिंकूच्या वडिलांनी सांगितल्या होणाऱ्या जावयाच्या अपेक्षा
आर्चीसोबत लग्न करायचे आहे? रिंकूच्या वडिलांनी सांगितल्या होणाऱ्या जावयाच्या अपेक्षा
Embed widget