एक्स्प्लोर

वरात लग्न मंडपात जाण्याआधी मतदान केंद्रावर!

परभणी : डोक्याला मुंडावळ्या, वाजंत्री, घोडीवर बसलेला नवरदेव, अशी लग्नाची वरात थेट मतदान केंद्रावर जाऊन पोहोचली आणि केंद्रावर एकच उत्साहाचं वातावरण तयार झालं. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील राणी सावरगावमधील अमोल धुळे या तरुणाने तमाम मतदारांसमोर आदर्श ठेवला आहे. लग्नघर म्हटलं तर सगळीकडे लगबग आलीच. अमोल धुळेच्या घरातही मागील दोन दिवसांपासून लग्नाची जोरदार तयारी सुरु होती. परंतु लग्नाच्या गडबडीत मतदान चुकू नये अशी भूमिका अमोलने घेतली होती. त्यामुळे अमोल धुळेने वरात लग्न मंडपात न नेता आधी मतदान केंद्रावर नेली आणि मतदान करुन त्याने आपला अधिकार बजावला. मतदान करण्यासाठी अमोलने वेळ काढल्यामुळे त्याचं प्रचंड कौतुक होत आहे. शिवाय आपणही मतदानाचा हक्का बजावला पाहिजे अशी भूमिका लोकांनी घेतली. LIVE : राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आज मतदान दरम्यान, राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी पहिल्या टप्प्याचं मतदान आज पार पडत आहे. 15 जिल्हा परिषद आणि 165 पंचायत समितीसाठी हे मतदान सुरु आहे. यामध्ये जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद या प्रमुख जिल्हा परिषदांचा समावेश आहे. 15 जिल्हा परिषदेच्या 855 जागांसाठी 4278 तर 165 पंचायत समित्यांच्या 1712 जागांसाठी 7693 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीमध्ये एकूण 17 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

विद्यार्थ्यांना शाळेतूनच पुस्तकांची सक्ती केली, CBSE शाळांवर कारवाई होणार; समिती नेमणार, मंत्र्यांची विधानसभेत घोषणा
विद्यार्थ्यांना शाळेतूनच पुस्तकांची सक्ती केली, CBSE शाळांवर कारवाई होणार; समिती नेमणार, मंत्र्यांची विधानसभेत घोषणा
Mumbai Sakinaka Manhole : मुंबईत उघड्या मॅनहोलने चालता-बोलता एकाचा बळी घेतला, नेमकं काय घडलं?, एबीपीच्या रिपोर्टरने सांगितला थरार
मुंबईत उघड्या मॅनहोलने चालता-बोलता एकाचा बळी घेतला, नेमकं काय घडलं?, एबीपीच्या रिपोर्टरने सांगितला थरार
मुंबईत मॅनहोलमध्ये पडून मृत्यू, उघड्या मॅनहोलपासून 20 फूट अंतरावर मृतदेह मिळाला, BMC चा कारभार चव्हाट्यावर!
मोठी बातमी : मुंबईत मॅनहोलमध्ये पडून मृत्यू, उघड्या मॅनहोलपासून 20 फूट अंतरावर मृतदेह मिळाला, BMC चा कारभार चव्हाट्यावर!
मुंबईत 2017 मध्येही अशीच दुर्घटना, डॉक्टरचा मृत्यू; महापौर म्हणाल्या, वॉर्ड ऑफिसरलाही कामाची माहिती नाही
मुंबईत 2017 मध्येही अशीच दुर्घटना, डॉक्टरचा मृत्यू; महापौर म्हणाल्या, वॉर्ड ऑफिसरलाही कामाची माहिती नाही

व्हिडीओ

Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट
Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळली; महाराष्ट्रातील अनेक प्रवासी गेल्या 12 तासांपासून एकाच जागेवर ताठकळले
उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळली; महाराष्ट्रातील अनेक प्रवासी गेल्या 12 तासांपासून एकाच जागेवर ताठकळले
Ketan Agrawal Siya Goyal Lohagadh Case Pune: केतनला धक्का सियाने दिला की चेतनने?; पोलीस आता लाय डिटेक्टर टेस्ट करणार, नेमकी कशी असते चाचणी?
केतनला धक्का सियाने दिला की चेतनने?; पोलीस आता लाय डिटेक्टर टेस्ट करणार, नेमकी कशी असते चाचणी?
मुंबईत 2017 मध्येही अशीच दुर्घटना, डॉक्टरचा मृत्यू; महापौर म्हणाल्या, वॉर्ड ऑफिसरलाही कामाची माहिती नाही
मुंबईत 2017 मध्येही अशीच दुर्घटना, डॉक्टरचा मृत्यू; महापौर म्हणाल्या, वॉर्ड ऑफिसरलाही कामाची माहिती नाही
कंपनीच्या कोणत्याही निर्बंधांशिवाय युएईमध्ये 5 वर्षे वास्तव्य करा! काय आहेत ग्रीन व्हिसाचे नियम आणि खर्च किती?
कंपनीच्या कोणत्याही निर्बंधांशिवाय युएईमध्ये 5 वर्षे वास्तव्य करा! काय आहेत ग्रीन व्हिसाचे नियम आणि खर्च किती?
मराठी बालभारतीच्या 6 वीतील 'लोकनृत्य' धड्यावरुन वाद; गुजरातसह इतर 4 राज्यातील लोकनृत्यांचा समावेश
मराठी बालभारतीच्या 6 वीतील 'लोकनृत्य' धड्यावरुन वाद; गुजरातसह इतर 4 राज्यातील लोकनृत्यांचा समावेश
Mumbai Rain: मोबाईलवर बोलता बोलता अरुंद मॅनहोलमध्ये माणूस पडला, मुंबईत सर्च ऑपरेशनचा थरार, PHOTO
मोबाईलवर बोलता बोलता अरुंद मॅनहोलमध्ये माणूस पडला, मुंबईत सर्च ऑपरेशनचा थरार, PHOTO
माहिती अधिकार कायद्यातील बदलांना स्थगिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या मागण्यांची दखल
माहिती अधिकार कायद्यातील बदलांना स्थगिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या मागण्यांची दखल
'अशी कोणती नावे आहेत, ज्यांच्यामुळे बृजभूषण यांना सुद्धा धोका वाटतो?' शक्तिशाली लोकसुद्धा नावे घेण्यास घाबरतात; राम मंदिरातील लुटीवरून अरविंद केजरीवालांचा खोचक सवाल
'अशी कोणती नावे आहेत, ज्यांच्यामुळे बृजभूषण यांना सुद्धा धोका वाटतो?' शक्तिशाली लोकसुद्धा नावे घेण्यास घाबरतात; राम मंदिरातील लुटीवरून अरविंद केजरीवालांचा खोचक सवाल
Embed widget