एक्स्प्लोर

पनवेल आजपासून महापालिका, राज्यातील 27 वी, तर रायगडमधील पहिली!

पनवेल : पनवेलकरांचं 25 वर्षांचं स्वप्न अखेर सत्यात उतरलं आहे. देशातील पहिली नगरपालिका म्हणून ओळखलं जाणारं पनवेल आजपासून महापालिका म्हणून ओळखलं जाणार आहे. शिवाय, आता पनवेल महापालिका की नगरपालिका, या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. पनवेल राज्यातील 27 वी, तर रायगड जिल्ह्यातील पहिली महापालिका ठरली आहे. आयुक्त, उपायुक्त कोण? आधीची पनवेल नगरपालिका आणि अधिकची 29 गावं मिळून पनवेल महापालिका अस्तित्त्वात आली आहे. नगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये सरकारकडून आज आयुक्तांची नियुक्ती करण्यात येईल आणि आयुक्तच प्रशासक म्हणून कामकाज पाहणार आहेत. तर नगरपालिकेचे विद्यमान मुख्याधिकारी मंगेश चितळे महापालिकेचे नवे उपायुक्त असतील. पहिला दिवस कसा असेल? महापालिकेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींची कागदपत्रे पहिल्या दिवशीच महापालिकेकडे सोपवली जातील. कारण आता ग्रामपंचायती संपुष्टात येऊन सर्व भाग महापालिका क्षेत्रात येईल. ग्रामपंचायती कार्यलये, कर्मचारीही महापालिकेकडे हस्तांतरित होतील. पनवेल नगरपालिका ते पनवेल महापालिका देशातील पहिली नगरपालिका म्हणून ओळख असेलल्या पनवेल नगरपालिकेची स्थापना 25 ऑगस्ट 1852 रोजी झाली. वाढत्या शहरीकरणामुळे पनवेलचं आता महापालिकेत रुपांतर करण्यात आले आहे. खरंतर महापालिका करण्याची मागणी गेल्या 25 वर्षांपासूनची होती. मात्र, अखेर पनवेलकरांच्या मागणीला न्याय मिळाला. राज्यातील 27 वी आणि रायगड जिल्ह्यातील पहिली महापालिका म्हणून पनवेल ओळखले जाणार आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात कोणता परिसर येणार? नवीन महापालिकेमध्ये नगरपालिका, पनवेल तालुक्यातील 29 गावं, तळोजा एमआयडीसी परिसर समाविष्ट होणार आहे. महापालिका अस्तित्वात आल्याने पनवेलकरांनी आनंद व्यक्त केला असून, विकासकामं झपाट्याने होतील, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केली आहे. सिडको कार्यक्षेत्र, गावठाण परिसरामध्ये ठप्प असणारी कामे मार्गी लागतील, असा विश्वास व्यक्त केला जातो आहे. राज्यातील 27 महापालिका : मुंबई-ठाणे विभाग मुंबई ठाणे नवी मुंबई पनवेल मीरा-भायंदर कल्याण-डोंबिवली उल्हासनगर भिवंडी-निजामपूर वसई-विरार पश्चिम महाराष्ट्र विभाग पुणे पिंपरी-चिंचवड सोलापूर कोल्हापूर सांगली-मिरज आणि कुपवाड मराठवाडा विभाग औरंगाबाद नांदेड-वाघाळा लातूर परभणी उत्तर महाराष्ट्र विभाग नाशिक मालेगाव अहमदनगर जळगाव धुळे विदर्भ विभाग नागपूर अमरावती अकोला चंद्रपूर

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जुलै 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जुलै 2026 | रविवार
Ambernath News :मोठी बातमी! अंबरनाथमधील शासनाच्या जमिनीवरील अनधिकृत घरं आता अधिकृत होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
राज्य सरकारचा मोठा निर्णय! अंबरनाथमधील शासनाच्या जमिनीवरील अनधिकृत घरं आता अधिकृत होणार; आमदार बालाजी किणीकर यांची माहिती
Gunaratna Sadavarte on Mumbai Tiranga Rally: ठाकरे दोन लेकरांचे प्रमोशन करण्यासाठी आले, घोषणा देण्यास रोजाने माणसं लावली; तिरंगा रॅलीवर गुणरत्न सदावर्तेंची घणाघाती टीका
ठाकरे दोन लेकरांचे प्रमोशन करण्यासाठी आले, घोषणा देण्यास रोजाने माणसं लावली; तिरंगा रॅलीवर गुणरत्न सदावर्तेंची घणाघाती टीका
Harshvardhan Sapkal: देवेंद्र फडणवीसांकडे केसाने गळा कापण्याचं कौशल्य, ते केंद्रात गेल्यास धर्मेंद्र प्रधानांपेक्षा चांगला कंट्रोल ठेवतील; हर्षवर्धन सपकाळांची खोचक टीका
देवेंद्र फडणवीसांकडे केसाने गळा कापण्याचं कौशल्य, ते केंद्रात गेल्यास धर्मेंद्र प्रधानांपेक्षा चांगला कंट्रोल ठेवतील; हर्षवर्धन सपकाळांची खोचक टीका

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Siddaramaiah: 'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
Zimbabwe vs India, 3rd T20I: टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
Paper Leak: पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
Embed widget