एक्स्प्लोर

पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा भाजपचा उल्लेख टाळला

गोपीनाथ मुंडेंच्या जयंतिदिनी आपण आता भाजपच्या कोअर कमिटीत नाही, असे सांगुन यापुढे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करणार असल्याचे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी आज केलेल्या दोन्ही ट्विट मध्ये भाजपचा उल्लेख त्यांनी टाळला आहे.

मुंबई : पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा आपल्या नावासमोर कमळाचं चिन्ह किंवा भाजप लिहिणे टाळले आहे. त्यांनी अटल बिहारी वाजपेयींना केलेले अभिवादन आणि नाताळच्या शुभेच्छांमध्ये कोठेही भाजपचा उल्लेख नसून केवळ पंकजा गोपीनाथ मुंडे एवढाच उल्लेख केला आहे. त्यामुळे हे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या दिशेने आणखी एक पाऊल मानले जात आहे. गोपीनाथ मुंडेंच्या जयंतिदिनी आपण आता भाजपच्या कोअर कमिटीत नाही, असे सांगुन यापुढे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करणार असल्याचे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी आज केलेल्या दोन्ही ट्विट मध्ये भाजपचा उल्लेख त्यांनी टाळला आहे. यातील एक ट्विट माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींना अभिवादन करणारे तर दुसरे नाताळानिमीत्त शुभेच्छा देणारे आहे. भाजप पक्ष मी सोडणार नाही, असं पंकजा मुंडे यांनी आपल्य भाषणातून ठासून सांगितलं. तसंच 27 जानेवारीला औरंगाबादमध्ये उपोषण करणार असून त्यानंतर राज्यभर मशाल दौरा करणार असल्याचा निश्चय पंकजांनी केलाय. सोबतच कोअर कमिटीतून मला मुक्त करा, असं आवाहनच पंकजांनी केलंय. लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या जन्मदिनानिमित्त परळीत पार पडलेल्या मेळाव्यात त्यांनी सांगितले. तर दुसरीकडे गोपीनाथगडावरील मेळाव्याच्या व्यासपीठावरुन भाजपमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर आली आहे. येत्या 26 तारखेपासून पंकजा मुंडे पुन्हा एकदा राज्यभर आपला दौरा करणार आहेत. परळी विधानसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर दीड महिन्यांनी पंकजा मुंडे बीड जिल्ह्यात परतल्या होत्या. मात्र गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनी मोठे शक्तिप्रदर्शन करत पंकजा मुंडे यांनी आपल्या पुढील राजकारणाची दिशा ठरवली आहे. त्यामुळे आगामी काळात गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान च्या माध्यमातून त्यांचे राज्य भर दौरा काढणार आहेत. या सोबतच भाजपाची भूमिका नेमकी कशी असणार आहे पाहणेसुद्धा मोठ औत्सुक्याचे असणार आहे. संबंधित बातम्या :  मी कुठेही गेलेलो नाही, अजूनही राष्ट्रवादीमध्येच : विजयसिंह मोहिते पाटील

महत्त्वाच्या बातम्या

..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 
राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chief Minister Wealth : देशातील सर्वात मोठा श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
सर्वात मोठा श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
Embed widget