बीड: राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या कामाचं विश्लेषण करताना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे. पालकमंत्र्यांच्या काळात बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून महिलांवरील अत्याचारात मोठी वाढ झाल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीड आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दल खालील महत्त्वाची वक्तव्य केली आहेत.
1. बीड जिल्ह्याचा बिहार होतोय असा आरोप नेहमी केला जातोय. बीडची बदनामी मी कधीच केली नाही, बीडचा बिहार होतोय असा आरोप पालकमंत्र्यांच्या पक्षाच्या आमदारांनी केला आहे. मी एका पक्षाची राष्ट्रीय सचिव आहे. माझ्यासाठी बीड आणि बिहार समान आहे.
2. बीडमध्ये कायदा आणि सुव्यस्था बिघडली आहे. पालकमंत्र्यांची जी इमेज आहे ती बिघडली आहे. त्यांच्याच पक्षाचे आमदार हे त्यांच्या विरोधात बोलतात.
3. पालकमंत्री त्यांच्याच पक्षाचे समाधान करु शकत नाहीत.
4. बीड जिल्ह्यामध्ये माफियाराज बोकाळला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
5. बीडमध्ये भ्रष्टाचार इतका वाढला आहे की प्रत्येक काम पैसा दिल्याशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे सामान्यांची कामं रखडली जात आहेत.
6. पालकमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांची इमेज ही त्यांच्यासारखीच झाली आहे. जिल्हा परिषद म्हणजे भ्रष्टाचाराचं कुरण झालं आहे. सर्वच ठिकाणी भोंगळ कारभार वाढला आहे.
7. या आधी बीडमध्ये चांगले अधिकारी यायचे, पण आता चांगले अधिकारी जिल्ह्यात यायला धजावत नाहीत.
8. बीड जिल्ह्याच्या लोकहिताची कोणतीही नवीन योजना अद्याप दिसली नाही. आम्ही जी या आधी कामं केली आहेत त्यांची उद्धाटनं मात्र पालकमंत्री करताना दिसत आहेत.
9. जिल्ह्यामध्ये दरोड्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच महिलांवरील अत्याचारात मोठी वाढ झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :