मुंबई :  महिन्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा अखेर सुटला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले आहे. तर, दुसरीकडे  एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई नको असे आदेश सरकारला दिले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा संपाला पाठिंबा देण्याऱ्यांचे गुणरत्न सदावर्तेंकडून (Gunratn Sadavarte) आभार मानले आहे. तर न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळाल्यानंतरच संपावर निर्णय घेऊ', असे सदावर्ते म्हणाले. कर्मचाऱ्यांना पीएफ, ग्रॅज्युएटी, पेन्शन द्यावी असेही म्हटले आहे. या निर्णावर गुणरत्न सदावर्ते  यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Continues below advertisement


निकालाचं संपूर्ण वाचन केल्यानंतरच डेपोत जायचं की नाही ठरवू. न्यायालयाने कर्मचाऱ्यांना मुदत नाही दिली तर कष्टकऱ्यांच्या प्रती हा आदेश आहे.  पाकिस्तान्यांसारखा अल्टिमेटम नाही. न्यायालयाचे आदेश स्पष्ट आहेत, त्यांचा पगार हा सराकरने द्यावा.  सातव्या वेतन आयोगाबाबत कारवाई करायची आहे, त्याबाबत कोर्टाने सांगितलं आहे, ती कारवाई आम्ही सुरु करू, असेही सदावर्तेंनी यावेळी सांगितले. 


सदावर्ते म्हणाले, कष्टकरी पाच महिने उपाशी  मरत होते ठाकरे सरकारने त्यांना विचारलं नाही.  ज्यांनी भुकेला अन्न दिलं, त्यांनी राजकारण नाव देऊ नये. चंद्रकांत पाटील, फडणवीस, नवनीत राणा, धोंडे, अनुराधा पौडवाल यांनी पाच महिने अन्न दिलं, त्यांचं खरोखर मी कौतुक करतो. त्यांचं मी अभिनंदन करतो, आभार मानणार नाही, कारण पोटाची भूक त्यांनी भागवलेली आहे.  


कोर्टाने या कष्टकऱ्यांना दिलासा आला आहे. पेन्शनच्या बाबतीत न्यायालयाने गांभीर्याने घेतलं, त्यामुळे 18 हजार पेन्शनधारकांना दिलासा मिळाला. ग्रॅज्युअटी आणि फंडबाबतही न्यायालयाने द्यायला सांगितले. अनिल परबांना तुम्हाला खासगी बसेस चालवण्यात जास्त रस आहे, आम्ही तक्रार करणार असल्याचे सदावर्ते म्हणाले.  


संबंधित बातम्या :


ST Workers Strike : एसटी संपाचा तिढा अखेर सुटला! एसटी कर्मचाऱ्यांनी 22 एप्रिलपर्यंत कामावर रूजू व्हावे, हायकोर्टाचे आदेश


ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांवरील शिस्तभंगाची कारवाई मागे घेणार, कामावर परतण्याचे परिवहन मंत्र्यांचे आवाहन