एक्स्प्लोर

Palghar : ओबीसी आरक्षणासाठी एकत्रित लढा, जीव गेला तरी चालेल पण ओबीसींना न्याय देऊनच स्वस्थ बसणार : छगन भुजबळ

Palghar : ओबीसी समाजासह इतर मागासवर्गीयांना 27 टक्के आरक्षण मिळायला हवे यासाठी सर्वोच्च न्यायालयात हा प्रश्न प्रभावीपणे मांडू असे राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी पालघर येथे केले.

Palghar : ओबीसी समाजासह इतर मागासवर्गीयांना 27 टक्के आरक्षण मिळायला हवे यासाठी एकत्रित लढा आवश्यक असून तसे आवाहन करताना संसदेसह सर्वोच्च न्यायालयात हा प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी पालघर येथे केले आहे. जोपर्यंत ओबीसींना संपूर्ण आरक्षण मिळत नाही तोपर्यंत जीव गेला तरी चालेल पण स्वस्थ बसणार नाही. आरक्षण मिळवून देणारच आणि आगामी काळात ओबीसी आरक्षणासह निवडणूक लढवू असा विश्वास त्यांनी पालघर येथे आयोजित भव्य मोर्चाला संबोधित करताना व्यक्त केला आहे.

ओबीसी हक्क संघर्ष समितीतर्फे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, छगन भुजबळ यांच्यासह नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे तसेच विविध समाजांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते. छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाबाबत निर्माण झालेल्या तिढ्याबद्दल तसेच गेल्या अनेक वर्षांत ओबीसी आरक्षणासाठी सुरू असलेल्या लढ्याची माहिती या मोर्चात सहभागी झालेल्या हजारोंच्या संख्येत नागरिकांना दिली. त्याचप्रमाणे, हा लढा अधिक प्रभावी करण्यासाठी त्यांनी उपस्थितांना आवाहन केले आहे.
"50 टक्क्यांच्या आरक्षणाची मर्यादा असताना केंद्र सरकारने 10 टक्के आरक्षण आर्थिक मागास वर्गाला दिले त्याच धर्तीवर ओबीसींसाठी अतिरिक्त आरक्षण देण्यास काय हरकत आहे ?" असा सवाल उपस्थित करून सर्वोच्च न्यायालयाने अपेक्षित असलेली ट्रिपल टेस्ट रद्द करण्याची मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. ओबीसींची जनगणना करणे आवश्यक असून त्यावर आधारित आरक्षणाची आपण मागणी करत असून यासाठी ज्याप्रमाणे विविध मागण्यांसाठी दलित आदिवासी समाजाचे खासदार एकत्रितपणे संसदेत लढा देतात त्याचप्रमाणे ओबीसी खासदारांनी एकत्रितपणे उभे राहण्याची गरज असल्याचे ना. कपिल पाटील यांना विनंती केली. ओबीसी समाजासाठी 27 टक्के आरक्षण मिळाल्याशिवाय राज्यात निवडणुका घेतल्या जाणार नाहीत असे सांगून ही लढाई शांत आणि संयमाने एकत्रितपणे लढून आरक्षण मिळवावे, असे आवाहन केले. या लढ्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लेखी सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकार आपली भूमिका मांडत असून धोक्यात आलेले आरक्षण पुन्हा मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू अशी राज्य सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. ओबीसीच्या लढ्यात सर्व संबंधितांनी एकजूट कायम ठेवावी असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
यावेळी खासदार राजेंद्र गावित जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही वाढाण, महिला विकास महामंडळाचे अध्यक्ष ज्योती ठाकरे, आमदार हितेंद्र ठाकूर, रवींद्र फाटक, किसन कथोरे, मनीषा चौधरी, क्षितिज ठाकूर, सुनील भुसारा, राजेश पाटील, श्रीनिवास वनगा, विनोद निकोले तसेच पालघरचे नगराध्यक्ष डॉ. उज्ज्वला काळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवा सांबरे आदी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री म्हणून नाही तर सर्वसामान्य ओबीसी म्हणून आपण या संघर्षांत उतरलो आहोत. आपल्या संघर्षांची ताकद आपल्याला आरक्षणाचा हक्क मिळवून देईल असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केला आहे. ओबीसी संघर्ष समितीला सोबतीला घेऊन आरक्षण मुद्द्यांवर केंद्रीय गृहमंत्री यांची भेट करून देईन अशी ग्वाही त्यांनी सभेसमोर दिली. केंद्रात ओबीसी समाजाचे 155 पेक्षा जास्त खासदार आहेत. आरक्षणासाठी सर्वांना एकत्रित करून आधी गृहमंत्री अमित शहा नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आरक्षणाच्या  मुद्द्यांसाठी शाश्वत प्रयत्न करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. स्वातंत्र्यानंतर ओबीसी बांधवांची जनगणना झाली नाही ती होणे आवश्यक असल्याचे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे यांनी प्रतिपादन केले तर राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये ओबीसींना शून्य टक्के आरक्षण असल्याचे आमदार मनीषा चौधरी यांनी लक्ष वेधले.

या मोर्चाच्या नेमक्या मागण्या काय आहेत?  

• जातनिहाय जनगणना
• ओबीसींना राजकीय आरक्षण
• नोकरीतील ओबीसी अनुशेष भरावे.
• ओबीसी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी 100 टक्के शिष्यवृत्ती
• आदिवासीबहुल जिल्ह्यांत कमी केलेले ओबीसी आरक्षण सुरू करावे.
• महाज्योती आणि इतर मागास आर्थिक विकास महामंडळ यांना भरीव निधी देण्यात यावा.
• पालघर जिल्ह्यातील स्थगित नोकरभरती लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देऊन करावी. 

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
Embed widget