एक्स्प्लोर
पालघर आणि भंडारा गोंदिया लोकसभेसाठी पोटनिवडणूक जाहीर
पालघर आणि गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. या दोन्ही मतदार संघांमध्ये 28 मे रोजी मतदान होणार असून 31 मे रोजी मतमोजणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज ही निवडणूक जाहीर केली आहे.
नवी दिल्ली : पालघर आणि गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. या दोन्ही मतदार संघांमध्ये 28 मे रोजी मतदान होणार असून 31 मे रोजी मतमोजणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज ही निवडणूक जाहीर केली आहे.
पालघरमधील भाजप खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे लोकसभेची जागा रिक्त झाली होती. तसंच भंडारा-गोंदिया मतदारसंघात नाना पटोलेंच्या राजीनाम्यामुळे लोकसभेची जागा रिक्त झाली होती. या दोन्ही मतदारसंघात 28 मे रोजी पोटनिवड घेण्यात येणार आहे. तसंच पतंगराव कदमांच्या निधनामुळे सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगाव मतदारसंघातील विधानसभेची जागाही रिक्त झाली आहे. या जागेसाठीही 28 मे रोजी मतदान होणार आहे.
भंडारा-गोंदिया निवडणूकीवर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहेत मात्र अद्याप निर्णय येणं बाकी आहे. याचिका दाखल असतानाही केंद्रीय निवडणूक आयोगाने या मतदारसंघात निवडणूक जाहीर केली आहे.
संबंधित बातम्या :
पालघरचे भाजप खासदार चिंतामण वनगा यांचं निधन
राजकारणातील विद्यापीठाची अखेर, पतंगराव कदम अनंतात विलीन
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचं निधन
पतंगराव, जयंतरावांनी आपापली विधानसभा जागा सांभाळावी : पाटील
फडणवीस किंवा प्रफुल्ल पटेल विरोधात असतील तरच लढेन: नाना पटोले
..तेव्हाच अशोक चव्हाणांनी पटोलेंना ऑफर दिली होती!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement