एक्स्प्लोर
येवल्यात तीन लाखांच्या पैठणींवर डल्ला, साड्या चोरल्यानंतर चोरांचा डान्स
येवला शहराजवळ तहसीलकडे जाणाऱ्या येवला कोपरगाव रस्त्यावर नाकोड पैठणीचे भव्य दुकान आहे. याठिकाणी पैठणीच्या बनवण्यासह विक्रीही होते.

मनमाड : पैठणी साड्यांचं माहेरघर म्हटल्या जाणाऱ्या येवल्यात चक्क तीन लाख रुपयांच्या पैठणी साड्यांची चोरी झाली आहे. येवला कोपरगाव मार्गावरील एका पैठणीच्या दुकानातून काल (रविवारी) मध्यरात्री 3 ते 4 चोरट्यांनी नाकोडा दुकानातून पैठणी चोरल्या. साड्या चोरल्यानंतर या चोरांनी आनंदाच्या भरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोर डान्सही केला. विशेष म्हणजे चोरट्यांनी हातमागावर तयार करण्यासाठी लावलेल्या पैठणी साड्याही सोडल्या नाहीत. या अनोख्या चोरीचा तपास पोलीस करत आहेत.
VIDEO | चोरट्यांचा पोपट, गेले एटीएम चोरीला आणि चोरुन आले पासबुक मशिन | धुळे | एबीपी माझा
येवला शहराजवळ तहसीलकडे जाणाऱ्या येवला कोपरगाव रस्त्यावर नाकोड पैठणीचे भव्य दुकान आहे. याठिकाणी पैठणीच्या बनवण्यासह विक्रीही होते. रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी शटर तोडून आत प्रवेश करत उच्च किमतीच्या दर्जेदार सुमारे 3 लाखांच्या पैठणी चोरल्या.
आज (सोमवारी) सकाळी हा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी हातमागावर तयार करण्यासाठी लावलेल्या पैठणीही सोडल्या नाहीत हे पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलिस या चोरीचा तपास करत आहेत.
VIDEO | विरारमध्ये साडीच्या दुकानातून पैठणी चोरली
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
करमणूक
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
