एक्स्प्लोर
रायगडमधील शिवसेना-काँग्रेस युतीवर ओवेसींचा निशाणा
रायगड : भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर शिवसेनेने रायगडमध्ये चक्क काँग्रेसशी हातमिळवणी केली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आलेत. त्यामुळे काँग्रेसच्या बॅनरवर सोनिया गांधींसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचाही फोटो झळकतोय. मात्र यावर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी निशाणा साधला आहे.
https://twitter.com/asadowaisi/status/831827854430138368
उद्धव ठाकरेंच्या जागी सोनिया गांधींसोबत माझा फोटो असता तर तुफान गहजब झाला असता, असं म्हणत ओवेसींनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
धर्मनिरपेक्षता, उदारमतवाद आणि हिंदुत्व हे ठरवण्याचा अधिकार लोकांचा आहे. पण उद्धव ठाकरेंच्या ऐवजी सोनियांसोबत माझा फोटो असता तर गहजब झाला असता, असं ओवेसींनी म्हटलं आहे.
रायगडमध्ये गेल्या निवडणुकीत शेकाप आणि राष्ट्रवादीमध्ये झालेल्या युतीनंतर शिवेसेनेला एकाकी लढत द्यावी लागल्याने विरोधी बाकावर बसावं लागलं होतं.
पेण, अलिबाग आणि रोह्यात शिवसेना आणि काँग्रेस एकत्र लढणार आहेत. शेकाप, राष्ट्रवादी आणि भाजपला पराभूत करण्यासाठी शिवसेनेने काँग्रेसला सोबत घेतलंय. या युतीमुळे रायगड जिल्हा परिषदेच्या 62 पैकी 34 जागा जिंकणार असल्याचा विश्वास शिवसेनेने व्यक्त केलाय.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement