एक्स्प्लोर

संविधान दिनानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रम, बारामतीत रॅली तर अकोल्यात 'वॉक फॉर संविधान'चे आयोजन 

Constitution Day : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित 'संविधान सन्मान दौड' मध्ये चिमुकल्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण उत्साहाने सहभागी झाले. बारामती शहरात संविधान दिनाच्या निमित्ताने संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

मुंबई : देशभरात आज संविधान दिन (Constitution Day) साजरा करण्यात येत आहे. महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून संविधान दिन साजरा करण्यात आला. पुण्यात जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी भारतीय संविधानाची माहिती देऊन संविधानातील प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. याबरोबरच 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत पुणे जिल्ह्यासह राज्यभरात समता पर्व साजरे करण्यात येणार असल्याची माहिती समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त संगीता डावखर यांनी दिली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित 'संविधान सन्मान दौड' मध्ये चिमुकल्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण उत्साहाने सहभागी झाले. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी हिरवा झेंडा दाखवल्यावर स्पर्धेला सुरुवात झाली. त्यानंतर संविधनातील उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. या दौडमध्ये पॅराप्लेगिक सेंटरचे वीस जवानांसह आर्मीचे साठ जवान  सहभागी झाले होते. 

बारामतीत रॅली
बारामती शहरात संविधान दिनाच्या निमित्ताने संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत समता सैनिक दलाचे कार्यकर्ते सहभागी झाले. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने या संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले. बारामती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून बारामती शहरातील मुख्य चौकातून रथ यात्रा काढण्यात आली. समता सैनिक दलाच्या अनेक कार्यकर्त्यांनी या रॅलीत सहभाग घेतला. 

डोंबिवलीत  संविधान प्रबोधन सभेचे आयोजन
संविधान दिनानिमित्त स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने डोंबिवलीत आज संविधान प्रबोधन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेस प्रमुख वक्ते म्हणून साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस उपस्थित होते. यावेळी श्रीपाल सबनीस यांनी संविधानाचे महत्त्व उपस्थिताना सांगितलं.

"सत्तेचे विकेंद्रीकरण म्हणजेच लोकशाही असून सत्ता केंद्रित करणे योग्य नाही. केंद्राच्या सत्ता केंद्रित करण्याच्या प्रयत्नामुळे राज्य आणि केंद्राचे संबंध बिघडले असून लोकशाहीच्या संपूर्ण रचनेला धोका निर्माण झाला आहे.  लोकशाही ज्या चार स्तंभावर उभी आहे ते स्तंभच डळमळीत झाले आहेत. हे चित्र लोकशाहीसाठी मारक असून लोकशाहीची तिरडी निघतेय की तिची गौरव यात्रा निघतेय असा प्रश्न पडल्याचे यावेळी श्रीपाल सबनीस म्हणाले.  

अकोल्यात 'वॉक फॉर संविधान' 

अकोल्यात संविधान दिनानिमित्त 'वॉक फॉर संविधान' आयोजन करण्यात आलं होतं. 'नेहरू युवा केंद्र', 'संविधान प्रचारक लोकचळवळ' आणि 'इंडियन स्पीकर फोरम' यांच्या वतीने हे आयोजन करण्यात आलं होतं. रेल्वे स्टेशन चौक ते अशोक वाटिका या मार्गावरून ही ' वॉक फॉर संविधान' रॅली काढण्यात आली. शहरातील नागरिक, विद्यार्थी, लोकप्रतिनिधी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. 

महत्वाच्या बातम्या

Constitution Day 2022: PM मोदी म्हणाले, संविधान आपली मोठी ताकद; सरन्यायाधीशांकडून संविधानिक मूल्ये वाचवण्याचे आवाहन

महत्त्वाच्या बातम्या

मान्सूनने देश व्यापला! पण 10 जुलैपासून मुंबईसह कोकण वगळगता उर्वरीत महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार, जाणून घ्या हवामानाचा अंदाज?
मान्सूनने देश व्यापला! पण 10 जुलैपासून मुंबईसह कोकण वगळगता उर्वरीत महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार, जाणून घ्या हवामानाचा अंदाज?
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
एका बाजूला एल निनो तर दुसऱ्या बाजूला मुसळधार पाऊस, 6 दिवसात मुंबईत 1240 मीमी पाऊस, सर्व विक्रम मोडले, हवामानात नेमका काय बदल झाला? 
एका बाजूला एल निनो तर दुसऱ्या बाजूला मुसळधार पाऊस, 6 दिवसात मुंबईत 1240 मीमी पाऊस, सर्व विक्रम मोडले, हवामानात नेमका काय बदल झाला? 
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा

व्हिडीओ

Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
Abhijeet Dipke: गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
NCP : अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादीच्या आमदारांची मागणी, देवेंद्र फडणवीस यांना निवेदन, केंद्राकडे शिफारस करण्याची विनंती
अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची मागणी
Prithviraj Chavan: संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
Embed widget