एक्स्प्लोर

सरकारविरोधात 'निंदा प्रस्ताव'; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचे विधानसभा अध्यक्षांना पत्र

Vijay Wadettiwar : यावर आता विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचे असणार आहे. तर, दुसरीकडे याच मुद्यावरून वडेट्टीवार आक्रमक होण्याची शक्यता आहे. 

नागपूर : राज्यात अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) , दुष्काळ (Drought) आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दोन दिवस चर्चा होऊन देखील सरकारने उत्तर दिले नाही.  चर्चा झाल्यावर सबंधित मंत्र्यांनी उत्तर देणे अपेक्षित असतांना दुसऱ्या आठवड्याचे कामकाज संपूनही सरकारने उत्तर न दिल्याने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकार विरोधात निंदा व्यंजक प्रस्तावाची नोटीस दिली आहे. तर, विधानसभा अध्यक्षांकडे सरकार विरोधात प्रस्ताव मांडण्याची सूचना केली आहे. त्यामुळे यावर आता विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचे असणार आहे. तर, दुसरीकडे याच मुद्यावरून वडेट्टीवार आक्रमक होण्याची शक्यता आहे. 

वडेट्टीवारांच्या पत्रात काय म्हटले आहे? 

अतिवृष्टी, दुष्काळ व अवकाळीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकन्यांना तातडीने मदत करण्याबाबत 11 डिसेंबर रोजी सभागृहात महाराष्ट्र विधानसभा नियम 101 अन्वये अल्पकालिन चर्चा उपस्थित करण्यात आली. या प्रस्तावावर विधानसभा सभागृहात 19 ते 20 डिसेंबर रोजी सर्वपक्षीय चर्चा करण्यात आली. राज्यात झालेली अत्तिवृष्टी, त्यानंतर पडलेल्या दुष्काळ व त्यानंतर अवकाळी पाऊस एकाच वर्षात अशा एका पेक्षा एक नैसर्गिक आपत्ती ओढविलेली असताना, अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. पीक विमा कंपन्यांच्या मुजोरपणामुळे शेतकरी पीक विम्यापासूनही वचित राहीला आहे. याबाबत तातडीने रोख मदत जाहीर करण्याची आवश्यकता असताना चर्चेच्या माध्यमातून शासनाकडे मागणी करण्यात आली. विधानसभेच्या प्रचलित प्रथा व परंपरेनुसार या प्रस्तावावर सभागृहात चर्चा संपल्याबरोबर संबंधित विभागाच्या मंत्री महोदयांनी त्यास ठोस उत्तर देणे अपेक्षित असते. तथापि, सदर प्रस्तावावर चर्चा होऊन चार दिवस उलटले असून शेतकरी हवालदील झालेला असतनाही आजमितीस शासनाकडून कोणतेही उत्तर सभागृहास देण्यात आलेले नाही अथवा कोणतीही मदत नुकसानग्रस्तांस करण्यात आलेली नाही. यावरुन शेतकऱ्यांप्रती शासनाच्या असलेल्या उदासिनतेचा हे सभागृह या ठरावाद्वारे तीव्र निषेध करीत आहे. उपरोक्त निदाव्यंजक ठराव स्वीकृत करुन, 18 डिसेंबर रोजी मला सभागृहात मांडण्याची परवानगी देण्यात यावी, असे वडेट्टीवारांनी विधानसभा अध्यक्षांना पाठवण्यात आलेल्या पत्रात म्हटले. 

वडेट्टीवार आक्रमक होण्याची शक्यता? 

राज्यातील शेतकऱ्यांच्या मुद्यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आज पुन्हा एकदा आक्रमक होण्याची शक्यता आहे. तसेच, सरकारला याच मुद्यावरून विरोधकांकडून घेरण्याचा प्रयत्न देखील केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याचा आजचा पहिला दिवस असून, पहिल्याच दिवशी अवकाळी आणि दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आज यावर काही महत्वाची घोषणा देखील केली जाऊ शकते. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Winter Session 2023: हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याचा आज पहिला दिवस; आजतरी मराठा आरक्षणावर चर्चा होणार?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
Share Market : सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना मोठा धक्का, 3 लाख कोटी बुडाले
सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना धक्का, 3 लाख कोटी बुडाले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Gauri Palave Death : लेकींच्या गळ्यात फास, किती सोसायचा त्रास Special Report
KDMC Mahayuti : 'लक्षात ठेवा कमळ', केडीएमसीत स्वबळ? डोंबिवलीमध्ये नेमकं कुणाचं 'कल्याण'?
Ayodhya Ram Mandir : राम मंदिरावर फडकणार धर्मध्वजा! थेट अयोध्येतून ज्ञानदा कदम यांचा Special Report
Gen Z In Election : 'जेन झी'ची भाषा, राजकारणाची दिशा; फडणवीसांचा हुकार, GEN Z ला संधी Special Report
Dharmendra Demise : रोमॅन्टिक हीरो ते बॉलिवूडचा सुपरस्टार..धर्मेंद्र! Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
Share Market : सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना मोठा धक्का, 3 लाख कोटी बुडाले
सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना धक्का, 3 लाख कोटी बुडाले
गावखेडी सोडा, आता मुंबईतही बिबट्याची दहशत; गोरेगाव पूर्व भागात रात्रीचा संचार, कॅमेऱ्यात कैद
गावखेडी सोडा, आता मुंबईतही बिबट्याची दहशत; गोरेगाव पूर्व भागात रात्रीचा संचार, कॅमेऱ्यात कैद
संतापजनक! प्रसुत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्यावरच सोडलं; मातेची चिमुकल्यासह 2 किमी पायपीट
संतापजनक! प्रसुत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्यावरच सोडलं; मातेची चिमुकल्यासह 2 किमी पायपीट
IND vs SA  : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत भारत पराभूत झाल्यास WTC फायनलचं काय होणार? जाणून घ्या समीकरण   
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत भारत पराभूत झाल्यास WTC फायनलचं काय होणार? जाणून घ्या समीकरण   
Team India : वॉशिंग्टन सुंदरला 8 व्या स्थानावर फलंदाजीला का पाठवलं? रवी शास्त्री गंभीरवर भडकले ; भारतावर दुसऱ्या कसोटीत पराभवाचं संकट
वॉशिंग्टन सुंदरला 8 व्या स्थानावर फलंदाजीला का पाठवलं? रवी शास्त्री गौतम गंभीरवर भडकले
Embed widget