एक्स्प्लोर

बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपकडून ऑपरेशन 'लोटस' आणि 'शिवतेज'?

बहुमत चाचणीअगोदर विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यासाठी भाजपकडून दोन ऑपरेशन राबवणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. यात राष्ट्रवादीसाठी ऑपरेशन लोटस तर, शिवसेनेसाठी ऑपरेशन शिवतेज राबवण्यात येणार आहे.

मुंबई : राज्याच्या राजकारणात रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. त्यात बहुमत चाचणीअगोदर विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाते. यात आपला अध्यक्ष निवडून यावा यासाठी भाजपने दोन मिशन हाती घेतल्याची सुत्रांची माहिती आहे. अध्यक्ष निवडीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आपल्याला मतदान करावे, यासाठी भाजपने ऑपरेशन लोटस आणि ऑपरेशन शिवतेज राबवणार असल्याची चर्चा आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात बंड पुकारुन भाजपशी हातमिळवणी केल्यामुळं राज्यात राजकीय भूकंप आला आहे. भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले आहे. मात्र, ते टिकवण्याचे भाजपसमोर आव्हान असणार आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी भाजपला 30 नोव्हेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत दिली आहे. त्याअगोदर विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. अध्यक्षांना निवडूण आणण्यासाठी भाजपकडे सध्या पुरेसे पाठबळ नाही. त्यामुळं भाजपकडून दोन मिशन राबवण्यात येणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. ऑपरेशन लोटस आणि शिवतेज? राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक मोठा गट अजित पवारांच्या पाठीशी असल्याचे बोलले जात आहे. अजित पवारांच्या शपथविधीला हजर असणाऱ्या आमदारांपैकी काही आमदार परतले आहेत. मात्र, अध्यक्षपदाची निवडणूक ही गुप्त पद्धतीने घेतली जाते. त्यामुळं कोणी कुणाला मतदान केले हे समजणार नाही. याचसाठी राष्ट्रवादीच्या आमदारांचे मन वळवण्यासाठी भाजपकडून ऑपरेशन लोटस राबवले जाणार आहे. तर, दुसरीकडे शिवसेनेच्या नेत्यांनी जरी भाजपशी युती तोडली असली तरी अजूनही शिवसेनेचे काही आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. हे आमदार हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपल्याला मतदान करतील, असा भाजपच्या नेत्यांना विश्वास आहे. यासाठी भाजप ऑपरेशन शिवतेज राबवणार आहे. ही दोन्ही मिशन सुरु झाली असल्याची चर्चा आहे. यातूनच राष्ट्रावादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदांराना सपर्क करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. याची जबाबदारी राधाकृष्ण विखे-पाटील, गणेश नाईक, नारायण राणे, बबनराव पाचपुते आणि अन्य काही नेत्यांवर दिल्याची चर्चा आहे. महाआघाडीकडून खबरदारी - दरम्यान, आमदार फुटू नये यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी योग्य ती खबरदारी घेत आहेत. यासाठी तिन्ही पक्षांकडून आमदारांना एकत्रित हॉटेलमध्ये ठेवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने त्यांच्या सर्व आमदारांना अंधेरीतील ललित हॉटेलमध्ये ठेवलं आहेत. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही कारणामुळे शिवसेनेच्या सर्व आमदारांना ललित हॉटेलच्या शेजारी असलेल्या द लेमन ट्री या हॉटेलमध्ये ठेवलं जाणार आहे. राष्ट्रवादीचे सर्व आमदार सध्या रेनेसन्स हॉटेलमध्ये आहेत. त्यांनाही हयात हॉटेल हलवण्यात येणार असल्याची माहिती आहे. संबंधित बातम्या - शरद पवारांच्या खंजिर प्रकरणाची ही पुनरावृत्ती : शालिनी पाटील अजित पवार लोकांची दिशाभूल करत आहेत, आम्ही महाविकासआघाडीसोबतच - शरद पवार शरद पवारच आमचे नेते, अजित पवारांचं ट्वीट, अजित पवार कोणत्या राष्ट्रवादीत माहीत नाही आव्हाडांची प्रतिक्रिया Special Report | महाराष्ट्रातही ऑपरेशन लोटस? नारायण राणेंच्या वक्तव्याचा अर्थ काय? | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

...तर जरांगेंच्या आधी मीच अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करणार, मंत्री राणेंचा इशारा, म्हणाले सडक्या आंब्यांना सोडणार नाही
...तर जरांगेंच्या आधी मीच अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करणार, मंत्री राणेंचा इशारा, म्हणाले सडक्या आंब्यांना सोडणार नाही
एकाच भटक्या कुत्र्याचा उच्छाद, हल्ल्यात 150 नागरिक जखमी, कल्याणच्या खडकपाडा परिसरात थरार
एकाच भटक्या कुत्र्याचा उच्छाद, हल्ल्यात 150 नागरिक जखमी, कल्याणच्या खडकपाडा परिसरात थरार
बुलढाणा जिल्ह्याचे 'राजमाता जिजाऊनगर' असं नामकरण होणार, भाजप आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांकडून कार्यवाही करण्याचे निर्देश
बुलढाणा जिल्ह्याचे 'राजमाता जिजाऊनगर' असं नामकरण होणार, भाजप आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांकडून कार्यवाही करण्याचे निर्देश
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget