एक्स्प्लोर

'खुला प्रवर्ग' सर्वच प्रवर्गातील गुणवत्ताधारक उमेदवारांसाठी खुला

खुला प्रवर्ग हा सर्वच प्रवर्गातील गुणवत्ताधारक उमेदवारांसाठी खुला असल्याचा फेरबदल सरकारने केला. 13 ऑगस्ट 2014 च्या परिपत्रकानुसार खुल्या प्रवर्गातील जागांवर आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराला गुणवत्ता असली तरी प्रवेश मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.

उस्मानाबाद : समांतर आरक्षणाच्या गोंधळाने राज्यात सुरू असलेल्या सामाजिक संभ्रमावर आज राज्य सरकारने तोडगा काढला आहे. खुला प्रवर्ग हा सर्वच प्रवर्गातील गुणवत्ताधारक उमेदवारांसाठी खुला असल्याचा फेरबदल सरकारने केला. 13 ऑगस्ट 2014 च्या परिपत्रकानुसार खुल्या प्रवर्गातील जागांवर आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराला गुणवत्ता असली तरी प्रवेश मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसारच राज्य लोकसेवा आयोगाने देखील पदभरतीची प्रक्रिया सुरू केलेली होती. मात्र, या परिपत्रकावर उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. 13 ऑगस्ट 2014 च्या परिपत्रकानुसार भरती प्रक्रीया राबविल्यास अनेक याचिक दाखल होण्याची शक्‍यता असल्याने भरती प्रक्रियेत अडथळे निर्माण होण्याची भीती सरकारने व्यक्‍त केली आहे. त्यानुसार 52 टक्‍के आरक्षित जागा सोडून उरलेल्या 48 टक्‍के खुल्या प्रवर्गातील जागांवर सर्वच प्रवर्गातील ( आरक्षित व अनारक्षित ) उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारे प्रवेश द्यावा, असे आदेश आज राज्य सरकारने पारित केले. 13 ऑगस्ट 2014 च्या परिपत्रकात बदल करताना नवीन सुधारित आदेशात सरकारने असे स्पष्ट केले आहे की, खुल्या प्रवर्गातील उमेदवारांची गुणवत्तेच्या निकषानुसार निवड यादी तयार करावी. या यादीत खुल्या प्रवर्गात गुणवत्तेच्या आधारावर मागासवर्गीय उमेदवारांचाही ( अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, वि.जा.भ.ज., विशेष मागास प्रवर्ग व एसईबीसी ) समावेश होईल. या गुणवत्तेच्या यादीनुसारच खुल्या प्रवर्गातील पदे भरावीत. मात्र, सरकारच्या या परिपत्रकाच्या विरोधात खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा असंतोष पेटण्याचे संकेत असून, हा सरळसरळ सर्वोच्च न्यायालयाचा अवमान असल्याची टीका सुरू झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Maratha Reservation: देवेंद्र फडणवीस अन् विखे पाटील आपल्याला फसवतायत, भाजप सरकार असेपर्यंतच मराठा समाजाच SEBC आरक्षण टिकणार; मराठा सेवा संघाचा आरोप, मनोज जरांगेंवरही टीका
देवेंद्र फडणवीस अन् विखे पाटील आपल्याला फसवतायत, भाजप सरकार असेपर्यंतच मराठा समाजाच SEBC आरक्षण टिकणार; मराठा सेवा संघाचा आरोप, मनोज जरांगेंच्या भूमिकेवरही टीका
Mhada house Lottery Mumbai: मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
Jalgaon Crime News : चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime News : चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
Mhada house Lottery Mumbai: मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
Embed widget