एक्स्प्लोर
Advertisement
शिवस्मारकाच्या भूमीपूजनाला अरबी समुद्रात फक्त हे सहा जण उतरणार!
मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात येत्या 24 डिसेंबरला अवघी शिवसृष्टी अवतरणार आहे. मुंबईतल्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी राज्य सरकारनं मेगा प्लॅन तयार केलाय.
उद्घाटन 24 डिसेंबरला असलं तरी 23 तारखेपासूनच म्हणजेच उद्यापासून वेगवेगळ्या कार्यक्रमांना सुरुवात होत आहे.
शिवरायांचा पुतळा बनवायला मिळणं भाग्य समजतो : राम सुतार
अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या भूमीपूजन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह फक्त सहा जण जाणार आहेत. भूमीपूजन आणि जलपूजनाला समुद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी विद्यासागर राव, उद्धव ठाकरे, उदयनराजे, संभाजी राजे जातील.VIDEO : असं असेल अरबी समुद्रातील शिवस्मारक!
भूमीपूजनापूर्वी भव्य कार्यक्रमांचं आयोजन राज्यभरातून आणि राज्याच्या बाहेरुन विविध सोळा ठिकाणांहून माती आणि पाणी आणण्यात येणार आहे. 23 तारखेला राज्यातून आलेली माती आणि पाणी यांचा कलश फ्लोटवर ठेवण्यात येईल. या फ्लोटसोबत सकाळी चेंबुरमधील शिवाजी महाराजांच्या मूर्तीपासून शोभायात्रेची सुरुवात होणार आहे.शिवस्मारकाच्या भूमीपूजनापूर्वी 23 डिसेंबरला भव्य शोभायात्रा
फ्लोट आणि शोभायात्रा सायन, लालबाग, गिरगाव चौपाटी असा प्रवास करत गेट वे ऑफ इंडियाला पोहोचणार. त्यानंतर गेट वे ऑफ इंडियावर उभारलेल्या भव्य स्टेजवर हा कलश, माती आणि पाणी सोपवलं जाईल. हेच पाणी आणि माती मुख्यमंत्री 24 डिसेंबरला पंतप्रधानांना देणार आहेत. त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते शिवस्मारकाचं भूमीपूजन होणार आहे.24 डिसेंबरला मुंबईसह महाराष्ट्र 'शिवमय' होणार
मुंबईसह राज्यभरात तयारी मुंबईसह महाराष्ट्रात येत्या 24 डिसेंबरला अवघी शिवसृष्टी अवतरणार आहे. मुंबईतल्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी राज्य सरकारनं मेगा प्लॅन तयार केलाय. उद्घाटन 24 डिसेंबरला असलं तरी 23 तारखेपासूनच म्हणजेच उद्यापासून वेगवेगळ्या कार्यक्रमांना सुरुवात होत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने कार्यक्रमाचे फ्लेक्स वाटप चालू असून अनेक ठिकाणी हे फ्लेक्स झळकणार आहेत.शिवस्मारकाच्या भूमीपूजनासाठी भाजपचा गाजावाजा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement