एक्स्प्लोर
प्रेमास नकार देणाऱ्या तरुणीसमोरच तरुणाची कृष्णा नदीत आत्महत्या
एकतर्फी प्रेमाच्या नैराश्यामुळे त्याने कृष्णा नदीवरील स्वामी समर्थ घाटावरुन नदीत उडी मारली. यावेळी नदीत पोहणाऱ्या लोकांकडून अबरारला वाचवण्याचा प्रयत्न झाला. परंतु कोणीही त्याचा जीव वाचवू शकले नाही.
सांगली : सांगलीत एका 24 वर्षीय तरुणाने एकतर्फी प्रेमातून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. तरुणाने त्याचे ज्या तरुणीवर प्रेम आहे, तिच्यासमोरच कृष्णा नदीत जलसमाधी घेत आत्महत्या केली आहे. तरुणीवरचे एकतर्फी प्रेम आणि तरुणीकडून प्रेमास मिळत असलेला नकार, त्यामुळे आलेल्या नैराश्यातून हा प्रकार घडला आहे.
अबरार झाकीर मुलाणी असे तरुणाचे नाव आहे. नैराश्यामुळे अबरारने कृष्णा नदीवरील स्वामी समर्थ घाटावरुन नदीत उडी मारली. यावेळी नदीत पोहणाऱ्या लोकांकडून अबरारला वाचवण्याचा प्रयत्न झाला. परंतु कोणीही त्याचा जीव वाचवू शकले नाही.
मुलाणीने तरुणीला फोन करुन मला तुझ्याशी खूप महत्त्वाचे बोलायचे आहे, असे सांगून तिला दुचाकीवरुन कृष्णा नदीवरील स्वामी समर्थ घाटावर नेले. दोघे घाटावरील पायरीवर दहा मिनिटे बोलत बसले होते. यावेळी अनेकवेळा तरुणाने तरुणीकडे माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे बोलून दाखवले. तरुणीने मात्र आपण दोघे मित्र आहोत आणि मित्रच राहू असे वारंवार सांगितले.
यामुळे संतापलेल्या अबरारने तिथून जात असताना दुचाकीजवळ तरुणीला थांबायला सांगितले. मी दोन मिनिटात नदीत जाऊन येतो, असे म्हणत तिच्याकडे दुचाकीची किल्ली व मोबाईल दिला. त्यानंतर त्याने थेट नदीत उडी मारली.
नदीच्या मध्यभागी गेल्यानंतर तरुणीला अबरारचा इरादा लक्षात आला. त्यानंतर तिने आरडाओरडा सुरु केला. मात्र नदीच्या मध्यभागी गेल्याने तो बुडू लागला. यावेळी नदीत पोहायला आलेल्या लोकांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु तोवर तो बुडाला होता.
यानंतर शहर पोलीस व महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याचा शोध घेतला. साडेपाच तासांच्या प्रयत्नानंतर तरुणाचा मृतदेह सापडला. तोवर ती तरुणी घाटावरच होती. पोलिसांनी तरुणीची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement