एक्स्प्लोर
उल्हासनगरमध्ये भाजपला धक्का, ओमी कलानींचा अर्ज बाद
उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. तीन अपत्य असल्याच्या कारणावरुन ओमी कलानी यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला आहे. माजी आमदार पप्पू कलानी आणि राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार ज्योती कलानी यांचे ते चिरंजीव आहेत.
21 फेब्रुवारीला उल्हासनगर महापालिकेसाठी मतदान होणार असून 23 तारखेला मतमोजणी होणार आहे. भाजपला या निवडणुकीत टीम ओमी कलानीची साथ मिळणार आहे. मात्र निवडणूक विभागाच्या तपासात टीम ओमी कलानीच्या प्रमुखांचा अर्ज बाद झाला आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बसून सभास्थळी तलवार घेऊन आल्याने ओमी कलानी चर्चेत आले होते.
संबंधित बातमी : उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीला झटका, कलानी-भाजप-रिपाइं युती
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement