एक्स्प्लोर
काय नेसावं, हेही आता सरकार ठरवेल, बीफ बंदीवरुन ओवेसींची उपहासात्मक टीका
सोलापूर : ‘काय खावं आणि काय नाही, हे पण आता सरकार ठरवू लागलं आहे. आता काय नेसावं, तेही ठरवतील’, असे म्हणत बीफ बंदीवरुन एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी राज्यासह केंद्रावर जोरदार टीका केली. ते सोलापुरातील सभेत बोलत होते.
सोलापूर महापालिका निवडणुकचं रणशिंग फुंकलं!
ओवेसी यांनी सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. औरंगाबादच्या धर्तीवर सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत भरभरुन मतदान करण्याचं आवाहन ओवेसी यांनी केलं आहे. यावेळी ओवेसी यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबरच फडणवीस सरकारवरही हल्लाबोल केला.
एमआयएमचे शहर अध्यक्ष तौफिक शेख यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून जनतेला ओवेसींनी जनतेला संबोधित केलं. ओवेसींच्या या सभेला तुफान गर्दी जमली होती.
“बॉम्बस्फोट प्रकरणात निष्पाप तरुणांना तुरुंगात टाकलं गेलं”
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी निष्पाप तरुणांना तुरुंगात टाकण्याचं पाप काँग्रेस राष्ट्रवादीने केल्याचं ओवेसी यांनी म्हटलं, तर हिमायत बेग, जर्मन बेकरी बॉम्ब स्फोट प्रकरणात निष्पाप लोकांना गोवल्याचंही ओवेसी म्हणाले. दुष्काळावरुन ओवेसींनी राज्य सरकार आणि मोदी सरकारवरही टीका केली आहे.
“दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या मदतीला केंद्र आणि राज्य सरकार धावून येत नाही हे दुर्दैव. तहानलेल्या लोकांना पाणी देण्याला प्राधान्य द्यावं. सत्ताधाऱ्यांनो अन्याय कराल तर कर्माची फळे भोगावी लागतील. गरिबांना अडचणीच्या काळात मदत करा.”, असे ओवेसी म्हणाले.
पाहा सोलापुरातील ओवेसींचं भाषण:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
ठाणे
Advertisement