एक्स्प्लोर

12 वीच्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस, बीडीएस प्रवेशासाठी यंदा मराठा आरक्षण नाही?

पदव्यूत्तर वैद्यकीय प्रवेशावेळी जो गोंधळ झाला अगदी तसाच गोंधळ आता एमबीबीएस आणि बीडीएस प्रवेशावेळी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई : पदव्यूत्तर वैद्यकीय प्रवेशावेळी जो गोंधळ झाला अगदी तसाच गोंधळ आता एमबीबीएस आणि बीडीएस प्रवेशावेळी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात मराठा आरक्षण नाही. तसेच एक नोव्हेंबर 2018 ला MBBS UG चे notification काढण्यात आले होते. त्यामुळे 30 नोव्हेंबरला लागू झालेले मराठा आरक्षण एमबीबीएस आणि बीडीएस प्रवेशावेळी लागू होणार नाही. दरम्यान एमबीबीएस आणि बीडीएस प्रवेश प्रक्रियेवेळीदेखील पदव्युत्तर मेडिकल प्रवेशाप्रमाणे घोळ होऊ नये याची काळजी राज्य सरकार घेत असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरिष महाजन यांनी सांगितले. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मराठा विद्यार्थ्यांना जो फटका बसला तसाच फटका बारावीनंतर मेडिकलच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांना बसणार आहे. त्यामागचे प्रमुख कारण म्हणजे पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाजो न्याय सुप्रीम कोर्टाने यंदा मराठा आरक्षण नाकारताना लावला आहे तोच न्याय नीट प्रवेश परीक्षेच्या बाबतीतही लागू होतो. महाराष्ट्र सरकारचा मराठा आरक्षणाबद्दल जो जीआर आहे त्यात असे म्हटले आहे की, ज्या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया मराठा आरक्षण लागू होण्याआधीच सुरू झाली आहे त्यांना यंदा हे आरक्षण लागू होणार नाही. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया ही 2 नोव्हेंबर 2018 ला सुरु झाली होती. तर मराठा आरक्षण 30 नोव्हेंबरला लागू झाले. याचाच आधार घेत काही विरोधी याचिका कोर्टात दाखल झाल्या आणि यंदा मराठा आरक्षण नाकारले गेले. त्याचप्रमाणे NEET ची प्रवेश प्रक्रिया ही एक नोव्हेंबरलाच सुरू झाली होती. त्यामुळे नीट प्रवेश प्रक्रियेतही मराठा आरक्षण लागू होणार नाही. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या 972 जागांपैकी 213 जागांवर मराठा विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. आता बारावीनंतरच्या मेडिकल अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेत ही संख्या कितीतरी पटींनी जास्त असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Maharashtra Live blog updates: नाशिक जिल्ह्यात पुन्हा सौम्य भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये चिंता
Maharashtra Live blog updates: नाशिक जिल्ह्यात पुन्हा सौम्य भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये चिंता
Ladaki Bahin Yojana :लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा
लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
Embed widget