एक्स्प्लोर

नितीन गडकरींचे महाराष्ट्राला गिफ्ट; 2100 कोटींहून अधिकच्या रस्ते कामांना मंजूरी

Maharashtra Road Work: रोडकरी म्हणून प्रसिद्ध असलेले केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari)  महाराष्ट्रातील 1900 कोटींच्या रस्ते कामाला मंजूर दिली आहे.

Maharashtra Road Work: रोडकरी म्हणून प्रसिद्ध असलेले केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari)  महाराष्ट्रातील 2100 कोटींहून अधिकच्या रस्ते कामाला मंजूर दिली आहे. या संदर्भात गडकरी यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. या रस्त्यांमध्ये परभणी, नांदेड, गडचिरोली आणि बारामतीच्या महामार्गाचा समावेश आहे. 

कोणत्या रस्त्यांसाठी किती कोटींची मंजूरी? 

गडकरी यांनी एका मागे एक असे ट्वीट करत महाराष्ट्रातील कोणत्या रस्त्यांसाठी किती कोटींची मंजूरी देण्यात आली आहे, या संदर्भात माहिती दिली आहे. यातच महाराष्ट्रातील एनएच-160 च्या उंडेवाडी कडे पठार ते देशमुख चौक व धवन पाटील चौक (बारामती) ते फलटण या 33.65 किमी रस्त्याचे 4-लेनमध्ये (पेव्ह्ड शोल्डरसहित) पुनर्वसन व अपग्रेडेशन करण्यासाठी 778.18 कोटींची मंजूरी देण्यात आली आहे. ढवळी ते गडचिरोली रस्त्याच्या एनएच-930 वरील ढवळी ते राजोली, पांधसाळा ते मोहडोंगरी, आंबेशिवणी फाटा ते बोदली आणि मेड तुकुम ते गडचिरोली या 28 किमी लांबीच्या सध्याच्या महामार्गाचे 2L+PS/4 लेनमध्ये पुनर्वसन व अपग्रेडेशन करण्यासाठी 316.44 कोटींची मंजूरी देण्यात आली आहे. एनएच-752 एच च्या चिखली - दाभाडी - तळेगांव - पाल फाटा या 37.260 किमी रस्त्याचे 2-लेन, तसेच 4-लेनमध्ये (पेव्ह्ड शोल्डरसहित) पुनर्वसन व अपग्रेडेशन करण्यासाठी 350.75 कोटींची मंजूरी देण्यात आली आहे.

तसेच एनएच-543 भाम्हापुरी - वडसा - कुरखेचा - कोरची - देवरी - आमगांव रस्ता व लेंधारी पुल या छोट्या पुलाच्या बांधणीला EPC मोडवर 163.86 कोटींसह मंजूरी देण्यात आली आहे. कुरखेडा शहरातील सध्याच्या महामार्गाचे 4-लेनमध्ये पुनर्वसन व अपग्रेडेशन करणे, शंकरपूर – गुरनुली विभागात 2-लेन रस्ता व भुती नाला आणि सती नदीवर मोठे पूल. याशिवाय महाराष्ट्रातील एनएच-753एच वरील भोकरदन ते कुंभारी फाटा आणि राजूर ते जालना विभाग, या 26.07 किमी रस्त्याचे 2-लेन तसेच 4-लेनमध्ये पुनर्वसन व अपग्रेडेशन करण्यासाठी 291.07 कोटींची मंजूरी देण्यात आली आहे. याशिवाय एनएच-161A च्या मुदखेड ते नांदेड विभागातील नांदेड - भोकर - हिमायतनगर - किनवट तसेच माहूर - अरणी रोड या रस्त्याचे 2-लेन तसेच 4-लेनमध्ये (पेव्ह्ड शोल्डरसहित) पुनर्वसन व अपग्रेडेशन करण्यासाठी 206.54 कोटींची मंजूरी देण्यात आली आहे.

अशोक चव्हाण यांनी मानले गडकरींचे आभार  

नांदेड जिल्ह्यातील रस्ते कामांसाठी 206.54 कोटी रुपयांची मंजूरी दिल्याने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी नितीन गडकरी यांचे आभार मानले आहे. अशोक चव्हाण ट्वीट करत म्हणाले आहेत की, ''नांदेड जिल्ह्यातील रस्ते विकासाच्या कामांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन निर्णय घेतल्याबद्दल मी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचा आभारी आहे.''

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule Visit Ajit Pawar Home : सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या मातोश्रीची भेटUddhav Thackeray Speech | खुर्चीवरून शिंदेंवर टीका, आरक्षणासाठी मनोज जरांगे, हाकेंना केलं आवाहनMCA Stadium : एमसीए उभारणार ठाण्यामध्ये भव्य स्टेडियम, सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षाManoj Jarnage Parbhani : मनोज जरांगेेंचा परभणीत प्रवेश, शांतता रॅली मराठ्यांची गर्दी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
Embed widget