एक्स्प्लोर

Nitesh Rane : "ठाकरे गटात आदित्य विरुद्ध राऊत गँगवॉर सुरू"; घोसाळकर गोळीबार प्रकरणावरून नितेश राणेंचा गंभीर आरोप

Nitesh Rane : घोसाळकरांची हत्या हे उबाठा गटात अंतर्गत चालू असलेल्या गँगवॉरचा परिणाम आहे. आदित्य विरुद्ध राऊत असा गँगवॉर उबाठात सुरु असल्याचा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केला आहे.

Nitesh Rane : विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव अभिषेक घोसाळकरांची (Abhishek Ghosalkar) हत्या हे उबाठा गटात अंतर्गत चालू असलेल्या गँगवॉरचा परिणाम आहे. आदित्य विरुद्ध राऊत हा जो गँगवॉर उबाठात अंतर्गत सुरू आहे. तो पहिले फक्त कपडे फाडेपर्यत होता. आता गोळी झाडेपर्यंत आल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे. 
 
मुंबईतील दहिसर (Mumbai Dahisar Firing)  परिसरातील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक (Shiv Sena UBT) अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची गोळ्या झाडून हत्या (Abhishek Ghosalkar Firing Case) करण्यात आली. मॉरिस नोरोन्हा (Morris Noronha) या स्वयंघोषित नेत्याने हा गोळीबार केला, आणि त्यानंतर नोरोन्हाने स्वतःवर गोळीबार करुन आत्महत्या केली. गेल्या काही दिवसांमधील राज्यातील हत्येच्या सत्रांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी ठाकरे गटावर कडाडून टीका केली आहे. 

मॉरिस आणि संजय राऊत यांचे काय संबंध आहेत?

नितेश राणे म्हणाले की, अभिषेक घोसाळकर हे आदित्य ठाकरे गँगमधील आहेत. मॉरिस आणि संजय राऊत यांचे काय संबंध आहेत? यासाठी त्यांचे सिडिआर तपासले पाहिजे, अशी मागणी मी करणार आहे. ज्या पद्धतीने राऊत तेजसला प्रमोट करत आहेत त्यामुळे हे गँगवॉर अजून कठोर आणि टोकाचे होत चाललेले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. 

...तर हा गँगवार उद्या मातोश्रीपर्यंत पोहोचेल

मी मागणी करेन हा जो मॉरिस आहे त्याचे उद्धव ठाकरे गटातील राऊत यांच्यासोबत काय संबंध आहेत याची चौकशी झाली पाहिजे. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांची नार्कोटेस्ट केली पाहिजे. या गँगवॉरमुळे आता सर्व गोळ्या मारण्यापर्यंत आलेले आहेत. जो मॉरिस राहुल गांधी यांच्या मुंबईतील यात्रेच्या तयारीला लागला होता. सगळीकडे उद्धव ठाकरेंचे बॅनर लावायचा तोच मॉरिस आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयाला गोळ्या झाडतो. आमच्या उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या नावावर खडी फोडण्याअगोदर तुमचे अंतर्गत सुरू असलेले गँगवार थांबवा नाहीतर हा उद्या मातोश्रीपर्यंत पोहोचेल, असेही नितेश राणे यांनी म्हटले आहे. 

मनमुख हिरेन, दिशा सालियन, सुशांत सिंह यांच्या हत्येच्या मागे कोण होत?

संजय राऊत हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागत होते. माणूस किती नालायक असू शकतो याला काही मर्यादा आहेत. स्वतःचा मालक मुख्यमंत्री असताना पोलिसांकडून हफ्ते गोळा करण्याचे काम हेच लोक करायचे. वसुली करण्याचे टार्गेट दिले जायचे. मनमुख हिरेन, दिशा सालियन, सुशांत सिंह राजपूत यांच्या हत्येच्या मागे कोण होत? टिळक नगर येथील पराडकर नावाचा गुंड हा राऊत आणि मातोश्रीमध्ये यांना चहा भरून देण्यासाठी असायचा. सचिन वाझे तर वर्षांमध्ये दोन-दोन, तीन तीन दिवस जाऊन रहायचा, असा हल्लाबोल नितेश राणे यांनी केला आहे.  

बुलडोझर देवा याच राज्यात सुरू

डॉक्टर महिलेला याच संजय राऊत यांनी जाहीर कॉलवर शिव्या आणि धमक्या दिलेल्या तरीही मुंबई पोलिसांनी याच्यावर साधी एनसी केलेली नव्हती. हे आमच्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोट उचलत आहेत. ज्या फडणवीस यांच्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था काय असते याचे चित्र आज जनतेला पहायला मिळत आहे. आज कुठेही अतिक्रमण असले की बुलडोझर देवा आमच्या याच राज्यात सुरू झाले आहे, असे ते म्हणाले.

आणखी वाचा 

गाडीखाली कुत्रं आलं तरी विरोधक राजीनामा मागतील, घोसाळकर गोळीबारप्रकरणावर फडणवीसांची प्रतिक्रिया

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget