एक्स्प्लोर

निलेश राणेंना पोटदुखी, तुरुंगवास टाळण्यासाठी रुग्णालयात दाखल

रत्नागिरी: काँग्रेस तालुकाध्यक्ष संदीप सावंत मारहाण प्रकरणी निलेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळून चिपळूण कोर्टानं त्यांना 15 दिवसांची न्यायलयीन कोठ़डी सुनावली. मात्र, त्यानंतर पोटदुखीचं कारण देत त्यांनी तुर्तास आपली तुरुंगवारी टाळली आहे.   सध्या निलेश राणेंना रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. आज दुपारी निलेश राणे पोलिसांना शरण आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना कोर्टात हजर केलं. त्यावेळी कोर्टानं निलेश राणेंना 15 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज केला.   कोर्टानं निलेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे निलेश राणेंना आजची रात्र तरी तुरुंगात काढावी लागणार होती. मात्र, आता पोटदुखीचं कारण देत त्यांनी तुरुंगवारी टाळली आहे.  असं दिसतं.   काय आहे प्रकरण? मराठा आरक्षणासाठी रत्नागिरीमध्ये  निलेश राणे यांची सभा होती. परंतु या सभेला संदीप सावंत कार्यकर्त्यांसह उपस्थित राहिले नाहीत. याच रागातून संदीप सावंत यांना चिपळूणजवळच्या घरातून मुंबईला नेण्यात आलं, तसंच प्रवासादरम्यान गाडीत मारहाण केल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे.   स्वत: निलेश राणे यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप आहे. इतकंच नाही तर त्यांना धमकी दिल्याचाही आरोप आहे.   संदीप सावंत यांच्या पत्नीचा दावा दरम्यान, संदीप सावंत यांनीही  काय प्रकार घडला याबाबतची माहिती माध्यमांना दिली. “स्वत: निलेश राणे आणि त्यांचे बॉडिगार्ड आमच्या घरी आले. त्यावेळी आम्ही जेवत होतो. निलेश राणेंनी संदीप यांना खाली येण्यास सांगितलं. त्यानंतर खाली गेल्यावर त्यांना मारहाण करुन गाडीत घालून घेऊन गेले,” असं संदीप सावंत यांच्या पत्नीने सांगितलं.   यानंतर रात्रभर संदीप सावंत यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, त्यांचा फोन लागत नव्हता. पहाटे पाचच्या सुमारास आमदार नितेश राणेंना फोन केला. मग राणेसाहेबांच्या पत्नीला फोन केला, त्यांनी थोड्यावेळानंतर संदीप घरी पोहोचतील असं सांगितल्याचं संदीप सावंत यांच्या पत्नी म्हणाल्या.   निलेश राणेंची प्रतिक्रिया दरम्यान, ही माझ्याविरुद्ध राजकीय खेळी असल्याची प्रतिक्रिया निलेश राणेंनी दिली आहे. तसंच संदीप सावंत 10 लाख रुपये मागत होते. पैसे दिले नाहीत म्हणून आरोप करत असावेत, असंही निलेश राणे म्हणाले.   संदीप आमचा कार्यकर्ता, आम्ही आमचं बघून घेऊ : नारायण राणे दरम्यान संदीप सावंत हा आमचा कार्यकर्ता असून, आम्ही आमचं बघून घेऊ, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी दिली. नारायण राणे यांनी 27 एप्रिलला ठाणे रुग्णालयात जाऊन उपचार घेत असलेल्या संदीप सावंत यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.  

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली, 17 ऑगस्टपर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार 
महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली, 17 ऑगस्ट पर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार 
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget