Sanjay Raut : विरोधीपक्ष नेत्याचं कामच असतं आरोप करण्याचं, त्यामुळे ते चर्चेत राहतात. आरोप करुन ते सनसनाटी निर्माण करतात. कालही त्यांनी असाच आरोप केला असल्याचं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. दरम्यान, हे स्क्रिप्ट कोणी लिहिले आहे. यामध्ये कोण कोण सामील आहे, याच्या तळाशी सरकार नक्की जाईल आणि दुसरा पेनड्राइव्ह घेऊन समोर येईल असे राऊत यावेळी म्हणाले. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्य सरकारवर पेनड्राइव्ह बॉम्ब फोडला आहे. त्यांनी काल केलेल्या आरोपांना संजय राऊत यांनी आज प्रत्युत्तर दिले.
गिरीष महाजनांविरोधात कुंभाड रचलं? असा आरोप विरोधी पक्षाकडून केला गेला. मात्र, महाराष्ट्र पोलीस असं कधी करत नाही. त्यांना चांगले प्रशिक्षण दिले जाते. राजकीय दबावाखाली ज्यांनी फोन टॅप केले त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. जर कुंभाड रचायचे असेल तर सीबाआय आणि ईडीकडे जावं लागले असा टोलाही राऊत यांनी यावेळी लगावला. खोट्या कारवाया कशा कराव्यात, राजकीय नेत्यांना कसे अडकवावे, खोटे पुरावे कसे सादर करावेत हे सध्या केंद्रीय यंत्रणाचे काम सुरु आहे. महाराष्ट्र पोलिसांना त्यांच्याकडून प्रशिक्षण घ्यावे लागेल असे राऊत यावेळी म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री अशा प्रकारचे प्रशिक्षण घेण्याची परवानगी देणार नाहीत असे राऊत यावेळी म्हणाले. तसेच भाजपचे सलीम जावेद कोणं? असा सवालही यावेळी राऊत यांनी केला.
देवेंद्र फडणवीस यांनी सनसनाटी निर्माण करणारे आरोप केले आहेत. यामागे कोण आहे. हे स्क्रिप्ट कोणी लिहिले आहे. भाजपचे सलीम जावेद कोणं? असा सवालही राऊत यांनी केला. यामध्ये सामील कोण आहे, यातील पात्र कोण आहेत, याच्या खोलाशी सरकार नक्की जाईल आणि सरकार दुसरा पेनड्राइव्ह घेऊन समोर येईल असे राऊत यावेळी म्हणाले.
विधानसभेत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर पेनड्राइव्ह बॉम्ब फोडल्यानंतर आज बुधवारी विधीमंडळात सरकार कोणती भूमिका घेणार आहे, याकडे लक्ष लागले आहे. फडणवीसांच्या आरोपांवर आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सभागृहात उत्तर देण्याची शक्यता आहे. राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे कार्यालय हे विरोधकांची कत्तल कशी करायची याचं कारस्थान शिजण्याचं मुख्य ठिकाण आहे. त्याच ठिकाणी गिरीश महाजन यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा कट रचल्याचा घणाघाती आरोप करत देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात खळबळ उडवून दिली. विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप असलेल्या व्हिडिओचा पेनड्राइव्ह फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिला.
महत्त्वाच्या बातम्या:
- Sharad Pawar : फडवणीसांच्या आरोपांवर शरद पवारांचे प्रत्त्युत्तर, म्हणाले...
- फडणवीसांचा पेनड्राइव्ह बॉम्ब; आज विधीमंडळात सत्ताधाऱ्यांकडून बचाव की आक्रमक भूमिका?