एक्स्प्लोर

तांबेवाडीत 12 वीच्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरवतानाचा व्हिडीओ 'माझा'च्या हाती

या व्हिडिओमध्ये पोलीस समोर असताना थेट दुसऱ्या मजल्यावर जाऊन विद्यार्थी खिडक्यातून कॉपी टाकताना दिसत आहेत.

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातल्या तांबेवाडीमध्ये बारावीचा इंग्रजीचा पेपर फुटल्यानंतर, त्याला पुष्टी देणारा आणखी एक व्हिडीओ ‘माझा’च्या हाती लागला आहे. या व्हिडिओमध्ये पोलीस समोर असताना थेट दुसऱ्या मजल्यावर जाऊन विद्यार्थी खिडक्यातून कॉपी टाकताना दिसत आहेत. काल बारावीची परीक्षा सुरु झाल्यानंतर, जेमतेम तासाभरातच इंग्रजीची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील तांबेवाडीच्या आश्रमशाळेत ही प्रश्नपत्रिका आढळून आली. विशेष म्हणजे, यानंतर पेपरफुटी प्रकरणाला वाचा फोडणाऱ्या तरुणाच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची माहिती काल समोर येत होती. दशरथ सोनावणे या तरुणाला शिक्षकांनी भररस्त्यात दमबाजी केली. एका राजकीय पक्षाचा झेंडा असलेल्या गाडीतून त्याचं अपहरण केल्याचं सांगितलं जात होतं. पण दुसरीकडे ही घटना उघड झाल्यानंतरही शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळा व्यवस्थापन आणि पोलिसांना संरक्षण देण्याची भूमिका घेतली. आश्रमशाळेत पेपरफुटीची घटना घडली नसल्याचा दावा गटशिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांनी केला. विशेष म्हणजे, तसा अहवालदेखील कांबळे यांनी सादर केला. पण आज या घटनेला पुष्टी देणारा आणखी एक व्हिडीओ माझाच्या हाती लागला आहे. या व्हिडीओत पोलीस समोर असताना थेट दुसऱ्या मजल्यावर जाऊन विद्यार्थी खिडक्यातून कॉपी टाकताना दिसत आहे. त्यामुळे पेपरफुटीप्रकरणी शिक्षण विभागाच्या भूमिकेमुळे विनोद तावडेंच्या शिक्षण विभागाला परीक्षेतले गैरप्रकार खरंच रोखायचे आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित बातम्या बारावीचा पेपर फुटला, तासाभरातच प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या, धनश्री सहस्रबुद्धे मनोरुग्णDevendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget