राज्यात नवं आव्हान, ऑक्सिजन पुरवठ्याची स्थिती चिंताजनक!
राज्यात लसीचा तुटवडा, ऑक्सिजनची कमतरता, रेमडिसिव्हरचा काळाबाजार अशी अनेक आव्हाने आता राज्य सरकारच्या समोर आहेत. त्यात ऑक्सिजन मिळत नाही म्हणून अनेकांना तडफडून आपला प्राण गमवावा लागतोय.
मुंबई : राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर थैमान घालायला सुरवात केली आहे. यात मृतांचा आकडा ही दिवसेंदिवस वाढू लागलाय. मात्र या कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी साधनसामग्री अपुरी पडताना पाहायला मिळतेय. राज्यात लसीचा तुटवडा, ऑक्सिजनची कमतरता, रेमडिसिव्हरचा काळाबाजार अशी अनेक आव्हाने आता राज्य सरकारच्या समोर आहेत. त्यात ऑक्सिजन मिळत नाही म्हणून अनेकांना तडफडून आपला प्राण गमवावा लागतोय.
राज्यात सध्या ऑक्सिजनची काय नेमकी परिस्थिती?
राज्यात कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी जवळपास पंधरा टक्के रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासू लागलीय. मात्र ही गरज पूर्ण करण्यासाठी ऑक्सिजनच उत्पादन अपुरं पडताना पाहायला मिळतंय. कोरोना आपत्कालीन परिस्थितीला एक वर्ष पूर्ण झालयं. मात्र राज्य सरकारकडून अजूनही म्हणावा तशा उपाययोजना होताना पाहायला मिळत नाही. ऑक्सिजन मिळत नाही म्हणून अनेक रुग्णांचे जीव जाऊ लागलेत. राज्यात नेमकी ऑक्सिजनची किती गरज आहे आणि किती ऑक्सिजनची निर्मिती होते.
सध्या राज्यात दररोज 1 हजार 237 मेट्रिक टन एवढीच ऑक्सिजनची निर्मिती होते.त्यासाठी 31कंपन्या ऑक्सिजनच उत्पादन करत आहे. त्यातील 7 ते 8 मुख्य उत्पादक कंपन्या आहेत तयार होणारा ऑक्सिजन रिफिल करण्यासाठी फक्त 71 रिफिरल आहे. राज्यात ऑक्सिजनची निर्मिती कमी होते म्हणून छत्तीसगढ आणि गुजरात राज्यातुन ऑक्सिजनची मागणी केली जाते.
ज्याप्रमाणे राज्यात झपाट्याने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्याचा आकडा पाहिला तर भविष्यात ऑक्सिजनसाठी किती मोठा संघर्ष करावा लागेल हे कालच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
गुरुवारपर्यंत राज्यात 5 लाख 29 हजार 982 रुग्ण ऍक्टिव्ह होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमानुसार एकूण अॅक्टिव्ह रुग्णांच्या 15 टक्के रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता लागते. त्याप्रमाणे 75 हजार 447 रुग्णांना कालपर्यंत ऑक्सिजनची गरज होती.या रुग्णासाठी 871 मेट्रिक टन ऑक्सिजन काल खर्च करण्यात आला. केवळ 1 हजार 818 मेट्रिक टन ऑक्सिजन आज शिल्लक आहे.
रोज कोरोनाचे झपाट्याने रुग्ण वाढत आहेत. ऑक्सिजनचा साठा मात्र एक दिवस पुरेल एवढाच शिल्लक आहे. कोरोनाचा महाराष्ट्रात संसर्ग वाढल्यानंतर मागील वर्षी राज्य सरकारने ऑक्सिजन निर्मितीसाठी नवीन कंपन्यांना परवानगी देणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार फक्त तीनच नवीन कंपन्याना परवानगी देण्यात आली आहे. त्या तीनही कंपन्यांच ऑक्सिजन उत्पादन फक्त दहा हजार मेट्रिक टन आहे.