एक्स्प्लोर

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या 'नीट' परीक्षेला 13 लाख परीक्षार्थी

वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय महाविद्यालयांमधील पदवी अभ्यासक्रमांच्या (एमबीबीएस आणि बीडीएस) प्रवेशांसाठी घेतल्या जाणाऱ्या ‘नीट’ परीक्षेसाठी यंदा 13.36 लाख विद्यार्थी बसणार आहेत.

मुंबई : देशभरात आज वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ‘नीट’ परीक्षा घेतली जात आहे. परीक्षेसाठी यंदा 13.36 लाख विद्यार्थी बसत असून ड्रेसकोडचा नवा नियम यावेळी लागू होत आहे. वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय महाविद्यालयांमधील पदवी अभ्यासक्रमांच्या (एमबीबीएस आणि बीडीएस) प्रवेशांसाठी घेतल्या जाणाऱ्या ‘नीट’ परीक्षेला बसणाऱ्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन लाखांनी अधिक आहे. यावर्षी बीड, बुलडाणा, लातूर, जळगाव, सोलापूर, मुंबई उपनगर या शहरात पहिल्यांदा नीट परीक्षा घेतली जात आहे. 'नीट'ची केंद्र वाढवल्यामुळे परीक्षार्थींची धावपळ कमी होणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) ही परीक्षा देशभरातील 150 शहरांमध्ये घेतली जात आहे. देशात सरकारी आणि खासगी महाविद्यालयांमध्ये मिळून पदवी अभ्यासक्रमाच्या 60 हजार जागा आहेत. या जागांच्या तुलनेत 20 पट अधिक विद्यार्थी ‘नीट’ परीक्षा देणार असल्याने यंदा प्रवेशांमधील स्पर्धा अधिक तीव्र होणार आहे. परीक्षेला जाण्यापूर्वी ही काळजी घ्या नीट परीक्षा आज सकाळी 10 ते 1 या वेळेत होणार आहे. त्यासाठी 7.30 ते 9.30 या वेळेत परीक्षार्थींना केंद्रावर हजर राहायचं आहे. तीन टप्प्यात तपासणीनंतर त्यांना केंद्रात प्रवेश मिळणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी हॉलतिकीट आणि पासपोर्ट साईज फोटोशिवाय परीक्षा केंद्रावर काहीही घेऊन जाऊ नये. परीक्षेच्या दिवशी परीक्षार्थींसाठी ड्रेसकोड परीक्षेच्या दिवशी हाफ स्लीव्हचे फिकट रंगाचे कपडे घालून या कपड्यांवर कोणत्याही प्रकारची बटणं लावलेली नसावीत. शिवाय मुलींनी एम्ब्रॉयडरी असलेले ड्रेसही परिधान करुन नयेत. परीक्षेच्या दिवशी शूज घालून येऊ नका. स्लिपर्स किंवा कमी उंचीच्या सँडल्स चालतील. बुरखा, पगडी परिधान करणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरु होण्याच्या एक तास आधी परीक्षा केंद्रावर पोहोचायला हवं. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची स्टेशनरी किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस घेऊन येऊ नये. परीक्षा केंद्रावर दागिने, हॅण्डबॅग, पाण्याची बाटलीही घेऊन येऊ नये

महत्त्वाच्या बातम्या

चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस

व्हिडीओ

Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report
Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Mutual Fund : 2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला

Embed widget