एक्स्प्लोर
नाशकात 'नीट' गोंधळ, हॉलतिकीटावर केंद्राचा चुकीचा पत्ता
नाशिक : नाशिकमध्ये नीट परीक्षेदरम्यान एका केंद्रावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
हॉलतिकीटावर भलताच पत्ता छापल्यामुळे सुमारे दोनशे विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलं.
नाशिकच्या आरटीओ कॉर्नर परिसरातील एकलव्य स्कूलमध्ये ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा होती, त्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटावर मुंडेगावच्या एकलव्य स्कूलचा पत्ता होता. ऐनवेळी झालेल्या या गोंधळामुळे विद्यार्थी अडचणीत आले.
नीट प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराचा फटका 200 विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता आहे. या प्रकारामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
राजकारण
बीड
राजकारण
Advertisement