एक्स्प्लोर

चांदा ते बांदा, राज्यात नीटसाठी फक्त सहाच परीक्षा केंद्र!

उस्मानाबाद/लातुर/औरंगाबाद: केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अनिवार्य झालेली वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश परिक्षा अर्थात 'नीट'ची अत्यंत अपुरी तयारी केली आहे. महाराष्ट्रासाठी फक्त सहाचं परिक्षा केंद्र मंजूर झाले आहेत. म्हणजे बांद्याच्या विद्यार्थ्याला मुंबईला आणि चांद्याच्या विद्यार्थ्याला नागपूरला जावून परीक्षा देण्याशिवाय पर्याय नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला किमान दहा हजार भुर्दंड लागेल. परीक्षेअधीचा आणि परिक्षेच्या दिवशी होणारा मनस्ताप वेगळा. या गोंधळामुळ महाराष्ट्राचा टक्का घसरण्याची भीती व्यक्त होत आहे. 20 हजार लोकसंख्येचं औराद शहजानी महाराष्ट्रातलं शेवटचं गाव आहे. इथून नीटच्या परीक्षेसाठीचं औरंगाबाद केंद्र गाठण्यासाठी 80 किलोमीटरचा प्रवास करुन आधी लातूर, लातूरहून 280 किलोमीटरचा प्रवास करत औरंगाबादला जायचंय. बसने प्रवास केला तर परीक्षार्थ्याला जाऊन- येऊन हजार रुपये लागतील. परीक्षार्थ्यासोबत पालक औरंगाबादला गेले तरे दहा हजार रुपये खर्च येईल. महाराष्ट्रातून यावर्षी 2 लाख 74 हजार विद्यार्थी नीटची परिक्षा देणार आहेत. एवढ्या विद्यार्थ्यासाठी नागपूर, नाशिक, ठाणे, मुंबई, पुणे आणि औरंगाबाद अशी सहाच केंद्र मंजूर आहेत. परिक्षा 7 मे रोजी सकाळी 10 ते 1 या वेळेत होईल. म्हणजे या केंद्रावर आदल्या दिवशी मुक्कामी जावेच लागेल. लॉजवाल्यांची चांदी. ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही ते विद्यार्थी रेल्वे स्टेशन, बस स्टॉपवर झोपलेली दिसू शकतात. आधीच नीटचं टेंशन त्यात परीक्षा केंद्र गाठण्याचा अतिरिक्त बोनस आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी 2017 पासून नीट अनिवार्य झाली. सर्वोच्च न्यायालयानं तसा निकाल गतवर्षी दिली. तेव्हापासून नीटच्या परिक्षा आयोजनाची नीट तयारी केली असती तर जिल्हानिहाय परिक्षा केंद्र देता येणं शक्य होतं. पण ना शिक्षणमंत्री विनोद तावडेंना याचं गांभीर्य वाटलं, ना केंद्राच्या शिक्षण मंत्र्यांना याची कोणी जाण करून दिली. नीटसाठी 21 जानेवारीपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली. 1 मार्च शेवटची तारीख आहे. परंतु परीक्षा केंद्राच्या घोळामुळं अजूनही काही परिक्षार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरलेले नाहीत. केंद्रीय पध्दतीनं यापूर्वी 2013 साली वैद्यकीय प्रवेश परिक्षा झाली होती.त्यात महाराष्ट्राचा उत्तीर्ण टक्का 6 टक्क्यापर्यंत घसरला होता. दाक्षिणात्या राज्यांनी निकालात आघाडी घेतली होती. नीटची परिक्षा 11 वी आणि 12 वीच्या संयुक्त अभ्यासक्रमावर अधारीत 180 प्रश्नांची होणार आहे. त्याचा तणाव विद्यार्थ्यावर असताना, परीक्षा केंद्राचं नियोजन बाबा आदमच्या जमाण्यासारखं का करण्यात आलंय, असा प्रश्न पालक शिक्षणमंत्र्यांना विचारत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
मी एकनाथ शिंदेंना खूप मानते, मराठी संस्कृतीचं अनुसरुन काम करते; नवी मुंबईत गौतमीचा जलवा, दहीहंडी उत्सवात थिरकली
मी एकनाथ शिंदेंना खूप मानते, मराठी संस्कृतीचं अनुसरुन काम करते; नवी मुंबईत गौतमीचा जलवा, दहीहंडी उत्सवात थिरकली
गोविंदा आला रे आला... डान्सही केला; मुंबईच्या मागाठाणे दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटींची मांदियाळी, 9 थरांचा थरार
गोविंदा आला रे आला... डान्सही केला; मुंबईच्या मागाठाणे दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटींची मांदियाळी, 9 थरांचा थरार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 सप्टेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 सप्टेंबर 2026 | शनिवार

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: बलूचिस्तान लिबरेशन आर्मीनं 25 पाकिस्तानी सैनिकांना ठार करत हाॅलिवुड ॲक्शन चित्रपटाला सुद्धा लाजवेल असा व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला!
Video: बलूचिस्तान लिबरेशन आर्मीनं 25 पाकिस्तानी सैनिकांना ठार करत हाॅलिवुड ॲक्शन चित्रपटाला सुद्धा लाजवेल असा व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला!
मी एकनाथ शिंदेंना खूप मानते, मराठी संस्कृतीचं अनुसरण करते; नवी मुंबईत गौतमीचा जलवा, दहीहंडी उत्सवात थिरकली
मी एकनाथ शिंदेंना खूप मानते, मराठी संस्कृतीचं अनुसरण करते; नवी मुंबईत गौतमीचा जलवा, दहीहंडी उत्सवात थिरकली
LIC-ICICI : एलआयसी आणि आयसीआयसीआय बँकेच्या डीलला RBI चा ग्रीन सिग्नल, सोमवारी स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
एलआयसी आणि आयसीआयसीआय बँकेच्या डीलला RBI चा ग्रीन सिग्नल, नेमकं काय घडणार?
संयुक्त राष्ट्राने जगाचा नकाशा बदलला, अमेरिकेनं केला निषेध, नव्या नकाशात आफ्रिका मोठा, तर युरोप-अमेरिका लहान; भारतावर काय परिणाम होणार?
संयुक्त राष्ट्राने जगाचा नकाशा बदलला, अमेरिकेनं केला निषेध, नव्या नकाशात आफ्रिका मोठा, तर युरोप-अमेरिका लहान; भारतावर काय परिणाम होणार?
गोविंदा आला रे आला... डान्सही केला; मुंबईच्या मागाठाणे दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटींची मांदियाळी, 9 थरांचा थरार
गोविंदा आला रे आला... डान्सही केला; मुंबईच्या मागाठाणे दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटींची मांदियाळी, 9 थरांचा थरार
Video: चिमुकल्याकडून मगात पाणी घेत अन् साबण लावून चक्क सापाचं सर्व्हिसिंग! व्हिडिओ पाहून अनेकांना घामटा फुटला
Video: चिमुकल्याकडून मगात पाणी घेत अन् साबण लावून चक्क सापाचं सर्व्हिसिंग! व्हिडिओ पाहून अनेकांना घामटा फुटला
Nepal : नेपाळमधील भीषण महाप्रलयाच्या 11 दिवसानंतर चमत्कार, ढिगाऱ्यातून महिलेला जिवंत बाहेर काढलं-VIDEO
नेपाळमधील भीषण महाप्रलयाच्या 11 दिवसानंतर चमत्कार, ढिगाऱ्यातून महिलेला जिवंत बाहेर काढलं
कुर्डूस गावातील विहिरीवरची दहीहंडी, तरुणाईचा उत्साह, गोविंदांची उंचच उंच उडी; जिल्ह्यातील नागरिकांचे आकर्षण
कुर्डूस गावातील विहिरीवरची दहीहंडी, तरुणाईचा उत्साह, गोविंदांची उंचच उंच उडी; जिल्ह्यातील नागरिकांचे आकर्षण
Embed widget