सोलापूर : मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत जोरदार गोंधळ घातला. पतंजलीच्या उत्पादनांना मार्केट मिळतं, मात्र बचत गटातील महिलांच्या हाताला काम मिळत नाही, असा आरोप करत अमृता फडणवीसांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
सोलापुरात महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला योगगुरु रामदेव बाबा, ज्येष्ठ अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी आणि अमृता फडणवीस यांची उपस्थिती होती. याच कार्यक्रमात अमृता फडणवीसांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
दरम्यान, घोषणाबाजी करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी वेळीच रोखलं आणि ताब्यात घेतलं.
अमृता फडणवीस यांनी आपल्या भाषणात पतंजलीचं कौतुक केलं. ''पतंजलीच्या उत्पादनांवर लोक डोळे झाकून विश्वास ठेवतात. पतंजलीच्या उत्पादनातून मिळणारा लाभ देशासाठी दिला जातो,'' असंही त्या म्हणाल्या.
या कार्यक्रमात हेमा मालिनी यांनीही महिला सक्षमीकरणावर मनोगत व्यक्त केलं. ''महिलांनी कुणाच्याही दबावात राहू नये. पतीचा सन्मान करत स्वतःच्या क्षमता सिद्ध कराव्यात,'' असं आवाहन हेमा मालिनी यांनी केलं.
सोलापुरात अमृता फडणवीसांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Mar 2018 07:22 PM (IST)
पतंजलीच्या उत्पादनांना मार्केट मिळतं, मात्र बचत गटातील महिलांच्या हाताला काम मिळत नाही, असा आरोप करत अमृता फडणवीसांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -