एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 18/03/2018

एबीपी माझाच्या प्रेक्षक आणि वाचकांना मराठी नववर्षाच्या शुभेच्छा!

  1. डोंबिवली, ठाण्यासह मुंबईत सांस्कृतिक कलाविष्काराने उत्साहात मराठी नववर्षाचं स्वागत, नाशकातही जल्लोष, तर पुण्यात पुस्तकांची गुढी https://goo.gl/RUwJRs

  2. महानगरांबरोबरच जिल्ह्याजिल्ह्यात नववर्षाचं स्वागत, कोल्हापुरात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गुळाचे सौदे, https://goo.gl/EHEeMt तर पंढरपुरात विठुरायाच्या चरणी भक्तांची गर्दी

  3. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, मुंबईतील सराफा दुकानांमध्ये गर्दी, सोन्याच्या बिस्किटांसह बांगड्या, हार, अंगठी आणि पारंपरिक दागिन्यांकडे ओढा http://abpmajha.abplive.in

  4. शिक्षकांचं वेतन रखडवल्याचा निषेध, शिक्षणमंत्री विनोद तावडेंच्या निवासस्थानी काळी गुढी उभारुन शिक्षक परिषदेचं आंदोलन https://goo.gl/sroQpo

  5. गुढीपाढव्यानिमित्त शिवतीर्थावर आज मनसेचा मेळावा, शरद पवारांसोबतच्या भेटीनंतर राज ठाकरे यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष https://gl/bouaCQ

  6. मोदी आडनाव भ्रष्टाचाराचं दुसरं नाव, काँग्रेस अधिवेशनात राहुल गांधींचा सनसनाटी आरोप, नेता आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमधील दरी मिटवणार असल्याचाही दावा https://gl/R395vg

  7. पंढरपुरात दिवसाढवळ्या नगरसेवकाची गोळ्या घालून हत्या, उपचारादरम्यान संदीप पवार यांचा मृत्यू, सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरु https://goo.gl/ixmaEy

  8. सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांचा गोंधळ, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी, बचत गटाच्या महिलांना काम मिळत नसल्याचा आरोप http://abpmajha.abplive.in

  9. संजय राऊत वगळता शिवसेनेचे सर्व नेते युतीसाठी इच्छुक, सुधीर मुनगंटीवार यांचा दावा, तर मुनगंटीवारांचा अभ्यास कमी पडतोय, राऊतांचं प्रत्युत्तर http://abpmajha.abplive.in

  10. स्पेलिंग चुकल्याने पिंपरी चिंचवडमध्ये शिक्षिकेची विद्यार्थ्याला लाकडी डस्टरने मारहाण, भोसरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल https://goo.gl/F3XXwG

  11. जामिनावर सुटलेला श्रीपाद छिंदम हजेरीसाठी पोलीस ठाण्यात आलाच नाही, जीविताला धोका असल्याने दुसऱ्या पोलीस ठाण्यात हजेरी लावल्याची शक्यता https://goo.gl/roS1gz

  12. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये स्वतंत्र जिल्ह्याची गुढी, प्रस्तावित नव्या जिल्ह्याचं मुख्यालय संगमनेरमध्ये करण्यासाठी जिल्हा कृती समिती आक्रमक https://goo.gl/TZj2V6

  13. उल्हासनगरच्या भाटिया चौकातल्या इमारतीत बिबट्याचा धुमाकूळ, वनविभागाच्या मदतीने बिबट्या जेरबंद, परिसरात दहशत https://goo.gl/z446G8

  14. विदर्भाची इराणी करंडकात विजयाची गुढी, रणजी विजेत्यांची शेष भारतावर पहिल्या डावातल्या आघाडीवर मात http://abpmajha.abplive.in

  15. तिरंगी टी-20 मालिकेत आज अखेरची लढत, बांगलादेशला हरवून विजयाची गुढी उभारण्याची टीम इंडियाकडे संधी http://abpmajha.abplive.in


BLOG : सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर यांचा ब्लॉग, कायद्यापेक्षा सत्याशी इमान असणारा ब्योमकेश बक्षी https://goo.gl/FA37SR

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा