सोलापूर: काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी अजित पवारांना केंद्रीय तपास यंत्रणाची नोटीस येते पण सुप्रिया सुळेंना का नाही येत?, असा सवाल उपस्थित केला होता. आता खा. सुप्रिया सुळेंचे पती सदानंद सुळे यांना आयकर विभागाची नोटीस आल्याचा गौप्यस्फोट स्वतः सुप्रिया सुळे यांनी केलाय. सोलापुरात पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.


सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "माझ्या नवऱ्याला इन्कम टॅक्सची नोटीस आली आहे. केंद्र सरकारच्या विरोधात तीन भाषणं केल्यानंतर हे घडलं. ज्या दिवशी तिसरं भाषण केलं त्याच दिवशी संध्याकाळी चार वाजता माझ्या नवऱ्याला इन्कम टॅक्सची नोटीस आली."


सुप्रिया सुळे पत्रकारांशी संवाद साधत होत्या. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे. याबाबत त्यांनी विस्तृत माहिती दिली नाही. फक्त आयकर विभागाची नोटीस आल्याची माहिती दिली. त्यामुळे ही नोटीस कोणत्या स्वरुपाची आहे, नेमक्या कोणत्या प्रकरणी आहे हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. 


अजित पवारांच्या घरी कधीच रेड पडली नाही, कदाचित लोकांना चुकीची माहिती दिली गेली असेल असं खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या. 


या आधी ठाण्यातील सभेत बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खासदार सुप्रिया सुळेंच्यावर टीका केली होती. राज ठाकरे म्हणाले होते की, एकाच घरात राहत असून अजित पवारांना ईडीची नोटीस येते पण सुप्रिया सुळे यांना नोटीस येत नाही. यामागे काय कारण आहे असा सवालही त्यांनी विचारला होता.


महत्त्वाच्या बातम्या: