Supriya sule : नवीन उद्योगांची उभारणी करण्यासाठी  महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे. हे मी सांगत नाही तर केंद्र सरकारचा डेटा सांगतो आहे. त्यामुळे या महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांनी कृपया दूर राहावं, असा सल्ला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना दिला आहे. तसेच सुप्रिया सुळे पुढे म्हणतात तुम्हाला भाषण करायचे आहे तर तुम्ही जरूर करा, पण आम्हाला काम करू द्या. भाषण करून तुमच्या माझ्या आयुष्यात काही फरक पडणार नाही आपली फक्त बदनामी होणार आहे, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी विरोधकांवर टीका केली आहे. महाराष्ट्र दिल्ली समोर झुकणार नाही आणि जर कुणी गडबड केली तर ऐकून घेणार नाही, असं म्हणत नाव न घेता सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय. मराठी मराठी करता जर खरंच मराठीवर एवढं प्रेम असेल,  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम असेल आणि त्या मिठाला जागा, महाराष्ट्राची बदनामी करू नका असा सबुरीचा सल्ला देखील सुप्रिया सुळे यांनी दिलाय.  खासदार सुप्रिया सुळे इंदापूरमध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यासाठी आल्या होत्या त्या वेळेस त्या बोलत होत्या.


मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या कामाची दखल महाराष्ट्राचं नव्हे तर देश घेईल, मी संसदेत जेव्हा भाषण करेल तेव्हा या आदर्श शहराचा आवर्जून उल्लेख करेल. आदर्श शहर कसं असावं हे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगेल. तुम्ही पण इंदापूर ला या! आणि चार गोष्टी आम्ही तुम्हाला सुचवतो कारण देश चालवत असताना आपण चांगल्या चांगल्या गोष्टी शिकत असतो. इंदापूर हे देशात आदर्श शहर होऊ पाहत असून त्या वेगाने बदल घडतो आहे अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कामाबद्दल पाठ थोपटलीय.


इंदापूर, बारामती आणि पुरंदरचा झपाट्याने विकास होत आहे. मात्र दौंडचा विकास होत नाही. त्यामुळे दौंडकडे जास्त लक्ष द्यायला लागेल, असं मत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केले आहे. सुप्रिया सुळे आज इंदापूर मध्ये विविध विकास कामाच्या शुभारंभ करण्यासाठी आल्या होत्या तेव्हा त्या बोलत होत्या.. इंदापूर, बारामती आणि पुरंदर मध्ये महाविकास आघाडीचे आमदार आहेत. परंतु दौंडचे आमदार हे भाजपचे आहेत. त्यामुळे तर दौंडचा विकास रखडत नाही ना? असा सवाल उपस्थित होत आहे.