Aurangabad News Update : "प्रत्येक संघटनेला बोलण्याचा हक्क आहे. त्यामुळे राज ठाकरेही बोलत आहेत. त्यांच्यावर आणि त्यांच्या सभेवर मला जास्त काही बोलायचे नाही. आमच्या कुटुंबियांवर बोलणं ही मोठी बातमी असते, त्यामुळं लोक बोलत असतात, असा टोला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लगावला आहे. 


औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे बोलत होत्या. त्या म्हणाल्या, राज्यात सध्या महागाईचा मुद्दा खूप महत्वाचा आहे. त्यामुळे इतर मुद्यांवर कोणाला काही बोलायचं आहे ते बोलू द्या, शिवाय कोणाला कुठं जायचं तिथं जाऊ द्या." 


"राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आतापर्यंत 103 रेड झाल्या आहेत. रेड पडण्याचा हा एक विक्रम झाला आहे. माझ्या घरावर हल्ला झाला त्यावेळी माझ्या मुलीने आणि आईने तातडीने पडदे बंद केले. परंतु, बाहेर नक्की काय झालं आहे हे त्यांना समजत नव्हतं. एसटी कर्मचाऱ्यांचे  प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्याचा प्रयत्न व्हायला हवा. या हल्ल्यात ज्या महिला होत्या त्यांना मी भेटणार आहे. कारण अशा पद्धतीने घरावर हल्ला करणं ही आपली संस्कृती नाही, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. 


सुप्रिया सुळे म्हणाल्या, "दंगली होऊ नये यासाठी सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करायला हवेत. दिल्लीत आणि इतर ठिकाणी झालेल्या दंगलींमुळे मी अस्वस्थ आहे. हे कोणासाठीच चांगलं नसून  यातून अर्थव्यवस्थेला फटका बसत आहे. अशा घटनांमधून फक्त नुकसान होत असतं."  


काश्मीर फाइल्स चित्रपटावरही सुप्रिया सुळे यांनी आपलं मत व्यक्त केलं. त्या म्हणाल्या, "काश्मीर फाइल्स हा वेदना देणारा सिनेमा आहे. काश्मीरमध्ये सर्व सुरळीत सुरू आहे. त्या लोकांमध्ये आता सुधारणा झाली आहे. त्या समाजाबाबत एवढं प्रेम आहे तर जम्मू काश्मीरच्या बजेटमध्ये त्यांच्यासाठी तरतूद का करण्यात आली नाही?"


महत्वाच्या बातम्या 


Gunratna Sadavarte : अॅड. गुणरत्न सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; सातारा सत्र न्यायालयाचा निर्णय


Narayan Rane Adhish Bungalow : माझं घर यांना दिसतं, मात्र भोंग्यांवर कारवाई करण्याची यांची हिम्मत नाही: नारायण राणे