एक्स्प्लोर

Shiv Sena : शिवसेना-धनुष्यबाणावर शरद पवार स्पष्टच बोलले, म्हणाले...

Sharad Pawar : शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाला मिळालं. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेय.

Sharad Pawar On Bow-Arrow Row : शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाला मिळालं. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेय. विरोधकांनी टीकास्त्र सोडलं. तर सत्ताधारी भाजपने एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलेय. यावर आज शरद पवार यांनी स्पष्टच शब्दात आपली भूमिका स्पष्ट केली. त्या वादात मी पणडणार नसल्याचं शरद पवार यांनी सागितलं. ते गोविंदबागेत बोलत होते. 

शिवसेना आणि धनुष्यबाण यावरून राज्यात सध्या सुरू असलेल्या वादात मी पडणार नाही. मी त्याबाबत परवाच माझी भूमिका स्पष्ट केली आहे, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनुष्यबाणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्टच सांगितली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याबाबत बोलताना पवार म्हणाले, सहकार परिषदेच्या समारंभासाठी पुण्यात आले होते. सहकार परिषदेचे उद्घाटन माझ्या हस्ते पार पडलं. त्यामुळे आमच्यात कोणतेही मतभेद नाही. धोरणात्मक विषयांवर आणि सविस्तर चर्चा केली. त्यांनी केलेल्या भाषणातील मुद्दे आज योग्य वाटले. बाकी राज्यात सुरू असलेल्या धनुष्यबाणाच्या वादात मी पडणार नाही एकदाच सांगितलं आहे, असे शरद पवार म्हणाले. 

मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेचे नाव - भुजबळ

आमच्या माहितीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे, सुभाष देसाई अशी काही नावं पुढे केली होती, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केला आहे. अगदी सुरुवातीला एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी सुचविण्यात आले होते. पण सिनियर म्हणून ठाकरे यांना गळ घालण्यात आली. शिवाय पवारसाहेबांनी तसा आग्रह केला. म्हणून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आल्याचे भुजबळ म्हणाले.

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मास्टरप्लॅन - 
शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. त्याशिवाय पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण हेही एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर एकनाथ शिंदे आता आपल्या सर्व आमदार आणि खासदारांना सोबत घेऊन आयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांचा हा आयोध्या दौरा पुढच्याच आठवड्यात नियोजित केला असल्याची माहिती मिळाली आहे. आयोध्या दौऱ्यावरून आल्यानंतर तेथील महंतांनी दिलेला धनुष्यबाण राज्यभर फिरवले जाणार आहे. 

आणखी वाचा :
Chhagan Bhujbal : उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांचं नाव सुचवलेलं, भुजबळांचा दावा

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Embed widget