एक्स्प्लोर

“महाराष्ट्राच्या लेकीला कुणी हात लावला, तर गाठ सुप्रिया सुळेशी”

“संघर्ष करायची वेळ आली, तर तीच सावित्रीची लेक झाशीची राणी झाल्याशिवाय थांबणार नाही.”

बारामती : महाराष्ट्राच्या लेकीला कुणी हात जरी लावला, तर गाठ सुप्रिया सुळेशी आहे, हे त्या पक्षाने लक्षात ठेवावे व त्या आमदारानेही लक्षात ठेवावे, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी दिला आहे. इंदापूर दौऱ्यावर असताना खासदार सुप्रिया सुळेंनी राम कदमांच्या बेताल वक्तव्यासंदर्भातही भाष्य केलं. खासदार सुप्रिया सुळे आज इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या. सकाळपासून त्या तालुक्यातील गावांना भेटी देत होत्या. त्यावेळी तालुक्यातील हिंगणगाव येथील एका सभेत बोलताना त्यांनी राम कदम यांच्या बेताल वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या? पुरोगामी महाराष्ट्रात सत्तेत असणारा एक आमदार जर महिलांना व मुलींना पळवून नेण्याची भाषा करत असेल, तर यासारखा काळा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. शिवाय, “संघर्ष करायची वेळ आली, तर तीच सावित्रीची लेक झाशीची राणी झाल्याशिवाय थांबणार नाही.” असेही त्या म्हणाल्या. “मुख्यमंत्र्यांनी जाहीर निषेध करायला हवाय, त्यांनी स्वतः या विषयावर दिलगिरी व्यक्त करायला हवी होती. जर दिलगिरी  व्यक्त करता येत नसेल, तर या आमदारावर ॲक्शन घ्या, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा.” अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली. शिवाय, हे प्रकरण मुख्यमंत्र्यांना झेपत नसेल, तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, महिलांच्या सुरक्षेचं काय करायचे, ते आम्ही बघू, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. यावेळी, “महाराष्ट्राच्या लेकीला कुणी हात जरी लावला, तर गाठ सुप्रिया सुळेशी आहे, हे त्या पक्षाने लक्षात ठेवावे व त्या आमदारानेही लक्षात ठेवावे”, असा इशाराही दिला. राम कदमांचं वादग्रस्त वक्तव्य "कोणत्याही कामासाठी भेटू शकता. साहेब, साहेब मी तिला प्रपोज केलं, ती मला नाही म्हणते, प्लीज मदत करा. शंभर टक्के मदत करणार. आधी मी सांगेन तुम्ही तुमच्या आई वडिलांना घेऊन या. जर आई-वडील म्हणाले की ही मुलगी मला पसंत आहे, तर तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार. त्या मुलीला पळवून आणण्यास मी मदत करेन. त्यासाठी माझा फोन नंबर घ्या आणि संपर्क साधा", असं राम कदम म्हणाले. राम कदम यांचा माफीनामा दहीहंडी उत्सवात महिलांविषयी केलेल्या बेताल वक्तव्याप्रकरणी भाजप आमदार राम कदम यांनी अखेर माफी मागितली आहे. राम कदम यांनी ट्विटरवर आपला माफीनामा सादर केला आहे. माता-भगिनींचा आदर करत मी माफी मागत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. राम कदम यांनी लिहिलं आहे की, "माझ्या वक्तव्याचा विपर्यास करुन माझ्या राजकीय हितशत्रूंनी जो वाद निर्माण केला त्यामुळे माता-भगिनींची मनं दुखावली. झाल्याप्रकरणी मी वारंवार दिलगिरी व्यक्त केली. पुन:श्च माता-भगिनींचा आदर करत मी माफी मागत आहे."

महत्त्वाच्या बातम्या

दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश; ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश; ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 ऑगस्ट 2026 | सोमवार
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
Embed widget