वाधवान कुटुंबाला कुठेही जाऊ देऊ नका, सीबीआयची सातारा जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
वाधवान बंधूंसह त्यांच्या कुटुंबीयांना महाबळेश्वरला जाण्याची विशेष परवानगी देण्याचं प्रकरण गाजत असतानाच आता तशाच प्रकारचं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. आमदार अनिल भोसले यांचा भाऊ नितीन भोसले यांच्यासह चार जणांनी प्रवास केल्याचं समोर आलं आहे. नितीन भोसले यांनी मुंबईतील वांद्रे इथल्या नातेवाईकांना आणण्यासाठी 8 एप्रिलला पुणे-मुंबई असा प्रवास केला. त्यासाठी मावळचे प्रांत संदेश शिर्के यांनी प्रवास करण्यासाठी परवानगीचे पत्र दिल्याचा दावा भोसले यांनी केला आहे. मात्र प्रांताधिकाऱ्यांनी आपण पत्रच दिलं नसल्याचं म्हटलं आहे.
शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा : आमदार अनिल भोसले यांना अटक
आमदार अनिल भोसले जेलमध्ये
पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी बॅंकेचे संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद आमदार अनिल भोसले हे जेलमध्ये आहेत. शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेत 71 कोटी 78 लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. शिवाजीराव सहकारी बॅंकेने नियमबाह्य पद्धतीने कर्जांचं वाटप केल्याचं आणि संचालकांच्या नातेवाईकांनाच कर्ज दिल्याचं उघड झाल्यावर, रिझर्व्ह बँकेने या बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासकाची नेमणूक केली होती. अनिल भोसले हे राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे विधानपरिदषदेचे आमदार बनले होते. मात्र तीन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीवेळी त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत घरोबा केला होता. अनिल भोसले यांच्या पत्नी रेश्मा भोसले या भाजपच्या नगरसेविका आहेत. या घोटाळ्या प्रकरणी ज्या 11 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे त्यामध्ये रेश्मा भोसले यांचाही समावेश आहे.