Supriya Sule : हे दडपशाहीचं सरकार, जे विरोधात बोलतात त्यांना नोटीस येते, सुप्रिया सुळेंचा निशाणा
नवीन पिढीला नोकऱ्या मिळणार असतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) निर्णयाचं स्वागत असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी व्यक्त केल.
Supriya Sule : जर या देशातील नवीन पिढीला नोकऱ्या मिळणार असतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) निर्णयाचं स्वागत असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी व्यक्त केल. केंद्र सरकारकडून बंपर भरती करण्यात येणार आहे. यामध्ये 10 लाख पदांवर भरती करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या सरकारी विभागांमध्ये अनेक सरकारी पदं रिक्त आहेत. याबाबतची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. यावर सुप्रिया सुळेंना विचारला असता त्या बोलत होत्या. यावेळी सुळे यांनी केंद्र सरकारवरही टीका केली. हे दडपशाहीचं सरकार आहे, जे विरोधात बोलतात त्यांना नोटीस येते असे त्या म्हणाल्या.
मी मंदिरात कधीही मागायला येत नाही
सुप्रिया सुळे या सध्या अमरावती दौऱ्यावर आहेत. यावेळी त्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. त्यांनी अंबादेवी आणि एकविरा मंदिर अमरावती मी मंदिरात कधीही मागायला येत नाही, तर आभार मानायला येते असेही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत मला वैयक्तिक मत व्यक्त करण्याचा अधिकार नाही. मी एक खासदार आहे आणि एका संघटनेत काम करते, असेही सुळे यावेळी म्हणाल्या.
पंतप्रधान मोदींची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारी नोकरी संदर्भात मोठी घोषणा केली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. सरकारकडून बंपर भरती करण्यात येणार आहे. यामध्ये 10 लाख पदांवर भरती करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या सरकारी विभागांमध्ये अनेक सरकारी पदं रिक्त आहेत. त्यामुळे मोदी सरकार आता मिशन मोडमध्ये आलं असून पुढील दीड वर्षामध्ये सरकार नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध करुन देणार आहे.
पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात ट्विट करत ही महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या भरतीअंतर्गत आधी 40 हजार पदांवर भरती करण्यात येईल. सरकारी आकडेवारीनुसार, सैन्य दलात मागील दोन वर्षांपासून भरती झालेली नाही. रेल्वेमध्ये विविध विभागात सुमारे तील लाखांहून अधिक पदं रिक्त आहेत. रेल्वेमध्ये 15 लाख 7 हजार 694 पद भरण्यास मंजूर असून सध्या 12 लाख 70 हजार 399 पदांवर भरती करण्यात आली आहे. पोस्ट ऑफिसमध्ये 90 हजार पदं रिक्त आहेत. महसूल विभागात सुमारे 75 हजार पदे रिक्त आहेत. संरक्षण विभागात सुमारे अडीच लाख पदे रिक्त आहेत. तर गृहमंत्रालयात सुमारे एक लाख 30 हजार पदं रिक्त आहेत.
महत्वाच्या बातम्या: