एक्स्प्लोर

56 इंची छाती असताना रोज जवान मारले जात आहेत : शरद पवार

दहशतवादी घटनेनंतर काँग्रेस सरकारने समर्थपणे परिस्थिती हाताळली होती, मात्र मोदींना ते जमलं नाही. छप्पन इंची छाती असताना रोज जवान मारले जात आहेत, असा घणाघात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

नांदेड : दहशतवादी घटनेनंतर काँग्रेस सरकारने समर्थपणे परिस्थिती हाताळली होती, मात्र मोदींना ते जमलं नाही. छप्पन इंची छाती असताना रोज जवान मारले जात आहेत, असा घणाघात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. नांदेडमधील महाआघाडीच्या पहिल्या संयुक्त प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर मोदी सरकारवर निशाणा साधला. नांदेडमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पीआरपी-रिपाई (गवई) गट, शेकाप व सीपीएमसह मित्र पक्षाच्या महाआघाडीची संयुक्त प्रचारसभा पार पडली. यावेळी व्यासपीठावर महाआघाडीचे दिग्गज नेते उपस्थित होते. शरद पवार यांनी पुलवामा हल्ल्यावरुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला. अशा स्थितीत आम्ही एकीचं दर्शन घडवत होतो. गृहमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत आम्ही सगळे उपस्थित होतो. मात्र त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचार सभेत व्यस्त होते, अशा शब्दात त्यांनी मोदींवर टीका केली. नोटाबंदी करताना दहशतवाद संपेल असं मोदींकडून सांगण्यात आलं होतं. मात्र दहशतवाद संपला का? छप्पन इंची छाती असतानाही रोज जवान मारले जात आहेत. नोटाबंदीचा फायदा काही झाला नाही मात्र देशातील जनतेला याचा खूप त्रास झाला. नोटबंदीमुळे गरिबांचा पैसा गेला. जीएसटीसारख्या निर्णयामुळे लाखो छोटे व्यापारी उद्धवस्त झाले, असं शरद पवार म्हणाले. नोटाबंदीनंतर दहशतवादी हल्ल्यात वाढ झाली आहे. दहशतवादी घटनेनंतर काँग्रेस सरकारने समर्थपणे परिस्थिती हाताळली होती. लालबहादूर शास्त्री पंतप्रधान असताना त्यांनी पाकिस्तानला धडा शिकवला. तर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी इतिहासच नाही तर पाकिस्तानचा भूगोलही बदलला, असं पवार म्हणाले. आघाडी सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली होती. मात्र युती सरकारने शेतकरी कर्जमाफीच्या नावावर शेतकऱ्यांची फसवणूक केली, असा आरोपही पवारांनी युती सरकारवर केला. 'ना खाऊंगा ना खाने दुंगा' म्हणाणारे मोदी, मग 500 कोटीचा राफेल 1500 कोटींचा कसा झाला? वाढीव किमतीचे पैसे गेले कुठे?, असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला. राफेलचं भूत सरकारला गाडल्या शिवाय राहणार नाही, असंही ते म्हणाले. शहीदांना वाहिली श्रद्धांजली या सभेच्या सुरुवातीला पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी व्यासपिठावरील सर्व नेते आणि उपस्थितांनी मेणबत्ती जाळून दोन मिनीट स्तब्ध उभारुन श्रद्धांजली वाहिली. यादरम्यान सभास्थळावरिल दिवे बंद करण्यात आले होते.

महत्त्वाच्या बातम्या

Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
महाराष्ट्रात पावसाचा यू-टर्न! पुढील दोन दिवस महत्वाचे, 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, पंजाबराव डखांचा अंदाज
महाराष्ट्रात पावसाचा यू-टर्न! पुढील दोन दिवस महत्वाचे, 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, पंजाबराव डखांचा अंदाज
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget