शरद पवार जातीपातीचे राजकारण करत नाहीत, परंतु... : रामदास आठवले
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद ( Sharad Pawar) पवार हे जातीपातीचे राजकारण करत नाहीत. परंतु, त्यांचे कार्यकर्ते जातीपातीचे राजकारण करतात , असा आरोप केंद्रीय मंत्री रामदास आठवले ( Ramdas athawale) यांनी केला आहे.

Ramdas athawale : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद ( Sharad Pawar) पवार हे जातीपातीचे राजकारण करत नाहीत. परंतु, त्यांचे कार्यकर्ते जातीपातीचे राजकारण करतात. भीमा कोरेगाव येथील घटनेवरून हे सिद्ध झाले आहे, असा आरोप केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
रामदास आठवले म्हणाले, कोरेगाव भीमा येथे 2018 मध्ये दंगल झाली. त्यावेळी तेथील सरपंच राष्ट्रवादीचे होते. तेथील हल्ल्यामागे राष्ट्रवादी नाही हे आम्हाला माहिती आहे. शरद पवार जातीपातीचे राजकारण करत नाहीत. परंतु, राष्ट्रवादीच्या खालच्या पातळीवर जातीपातीचे राजकारण केलं जातं.
रामदास आठवले यांनी यावेळी शिवसेनेवरही जोरदार टीका केली. ते म्हणाले, "भाजपला शिवसेनेने धोका दिला आहे. शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं असून उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले आहेत. शिवसेनेने पुन्हा भाजपबरोबर युती करण्याचा विचार करायला हवा."
मशिदीवरील भोंगे वाजल्यास त्यांच्या पुढे हनुमान चालीसा लावा, या राज ठाकरे यांच्या मताला रामदास आठवले यांनी विरोध दर्शविला असून त्यांच्या मताशी सहमत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कोणीच एकमेकांसमोर भोंगे लावू नये, असे आठवले यांनी म्हटले आहे.
दरम्यान, रामदास आठवले यांना आज सभेसाठी नागरिकांची वाट पाहावी लागली आहे. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आरपीआय आठवले गटाकडून सत्ता संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते. रामदास आठवले हे सायंकाळी पाच वाजता सभेच्या ठिकाणी आले. परंतु, सभेसाठी नागरिकांची गर्दी नव्हती. काही वेळाने काही प्रमाणात गर्दी झाली. त्यावर आठवले यांनी आपल्या भाषणात लोक खुर्च्यांवर बसत नाहीत, त्यांना वाटतं उभं राहिल्यानंतर तिकीट मिळेल, असं म्हणत उपस्थित नागरिकांना मिश्किल टोला लगावला.
महत्वाच्या बातम्या
- MNS : भोंगे लावणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्याला पोलिसांची नोटीस आणि दंड
- Jitendra Awhad : मदरशात एक वस्तरा सापडला तर राजकारण सोडेन, जितेंद्र आव्हाडांचं राज ठाकरेंना आव्हान
- Ajit Pawar : राज ठाकरे सरड्यासारखे रंग बदलतात, अजित पवारांची टीका
- Sharad Pawar : जातीपातीचं राजकारण, ईडी ते राज ठाकरेंना प्रत्युत्तर, शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
