(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jitendra Awhad : मदरशात एक वस्तरा सापडला तर राजकारण सोडेन, जितेंद्र आव्हाडांचं राज ठाकरेंना आव्हान
राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आग लावण्याचं काम करु नये. समाजात तेढ निर्माण करण्याचा राज ठाकरेंचा उद्देश स्पष्ट दिसतोय, अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) केली आहे.
मुंबई: काल राज ठाकरेंनी मदरशात एक धाड टाका असं वक्तव्य केलं होतं. त्यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंना आव्हान दिले आहे. मदरशात एक वस्तरा सापडला तर राजकारण सोडेन, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. राज ठाकरेंकडून समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राज ठाकरे यांनी आग लावण्याचं काम करु नये, त्यांचा उद्देश स्पष्ट दिसतोयअसंही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
राज ठाकरेंनी कालपासून तरूणांना रोजगार देण्याचे काम सुरू
जितेंद्र आव्हाड म्हणाले, दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम राज ठाकरे करत आहेत. कालपर्यंत महाराष्ट्राचा विकासाची, रोजगाराची भाषा करणारे राज ठाकरे यांनी कालपासून तरूणांना रोजगार देण्याचे काम सुरू केले आहे. तरूणांनी मशिदी समोर जायचे. यामुळे दोन्हीकडून आग लागेल. राज ठाकरे राजतीर्थावर घरी निवांत बसून मजा बघतील. आंदोलन करणारे तुरुंगात जातील, सोडायला कोणीही येत नाही. मग आई वडिलांना धावपळ करावी लागते. हे जुने गणित आहे.
राज ठाकरे कधी आयुष्यात जय भीम म्हणाले आहेत का?
काल त्यांना अचानक बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा पुळका आला. कधी आयुष्यात जय भीम म्हणाले आहेत का? कधी घरापासून पाच मिनिटाच्या अंतरावर असलेल्या चैत्यभूमीवर गेलेत का? असा सवाल देखील आव्हाडांनी या वेळी उपस्थित केला.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
मुंबईतील मशिदी आणि मदरशांमध्ये देशविरोधी कृत्ये सुरू आहेत. घातपाती कारवायांची भयानक कटकारस्थाने कशी सुरू आहेत, याची माहिती तुम्हाला पोलिस देतील. आपल्याला घातपाती कारवायांसाठी पाकिस्तानची गरजच नाही. या मशिदी आणि मदरशांमध्येच घातपाती कारवाया करणारे दडले आहेत. याविषयी माहिती मिळाली तर तुम्हाला धडकी भरेल, असे राज ठाकरे म्हणाले,
संबंधित बातम्या :