एक्स्प्लोर

सांगलीत राष्ट्रवादीच्या नेत्याची निर्घृण हत्या, पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज

सांगलीत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी पंचायत सभापती मनोहर पाटील यांची हत्या करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी पलूस तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते आनंदराव पाटील यांची हत्या झाली होती.

सांगली : सांगलीतील राष्ट्रवादीचे नेते आणि माजी पंचायत समिती सभापती मनोहर पाटील यांची हत्या करण्यात आली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील देशिंग येथे अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार  शस्त्रांनी हल्ला करत त्यांची हत्या केली आहे. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त वर्तवण्यात येत आहे. मात्र या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मनोहर पाटील बुधवारी संध्याकाळच्या सुमारास कवठेमहांकाळ तालुक्यातील देशिंग येथील बोरगाव रस्त्यावर काही जणांसोबत बोलत उभे होते. त्यावेळी अचानक काही अज्ञातांनी येऊन मनोहर पाटील यांच्यावर धारधार शस्त्रांनी हल्ला चढवला. अचानक घडलेल्या हल्ल्यामुळे पाटील यांना स्वत:चा बचाव करण्याची संधीही मिळाली नाही. पाटील यांना गंभीर जखमी करुन हल्लोखोर पसार झाले. दरम्यान तेथे उपस्थित असणाऱ्या ग्रामस्थांनी मनोहर पाटील यांना तातडीने मिरज येथील मिशन रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर गावात तणावाचं वातावरण असून तेथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हत्येप्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.

कोण आहेत मनोहर पाटील

मनोहर पाटील हे कवठेमहांकाळ तालुक्यातील हरोली गावचे रहिवाशी होते. या गावचे ते उपसरपंच राहिले होते. 2017 मध्ये पंचायत समिती सदस्यपदाची निवडणूक त्यांनी लढवली आणि ते विजयी देखील झाले होते. कवठेमहांकाळ पंचायत समिती सभापती पदही त्यांनी भूषवलं होतं. सध्या मनोहर पाटील हे कवठेमहांकाळ येथील महाकाली साखर कारखान्याचे संचालक होते.

चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या आनंदराव पाटलांची हत्या

चार दिवसांपूर्वी पलूस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस नेते आनंदराव पाटील यांची हत्या झाली होती. आनंदराव पाटील यांच्या डोक्यात वार करून हल्लोखोर पसार झाले होते. राजकीय वादातून हा हल्ला झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या हल्ल्यात पाटील गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आनंदराव पाटील हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे स्वीय सचिव गजानन पाटील यांचे बंधू होते.

महत्त्वाच्या बातम्या

Praniti Shinde:  सोनिया गांधींनंतर आता प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’वरून नवी चर्चा, संपूर्ण वंदे मातरम न म्हटल्याने वादाला तोंड फुटण्याची शक्यता
सोनिया गांधींनंतर आता प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’वरून नवी चर्चा, संपूर्ण वंदे मातरम न म्हटल्याने वादाला तोंड फुटण्याची शक्यता
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते

व्हिडीओ

Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Embed widget