Mahesh Tapase on Jitendra Awhad Resignation of MLA : राष्ट्रवादी (NCP) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर जाणूनबुजून आणि सुडबुद्धीनं विनयभंगाची कारवाई करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी केला आहे. तसेच, जितेंद्र आव्हाड यांच्या पाठीशी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस असल्याची माहितीही राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी बोलताना सांगितलं की, "राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर जाणूनबुजून आणि सुडबुद्धीनं करण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या पाठीशी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस उभी आहे. कळवा-मुंब्रा उड्डाण पुलाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांवर श्रेयवादाची टिका केली होती. त्यातूनच ही कारवाई झाली आहे.", असंही महेश तपासे म्हणाले आहेत.
"राज्यघटनेच्या संरक्षणार्थ आवाज उठवणारे लढवय्ये नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा शिंदे-फडणवीस सरकारनं दाखल केला आहे. ज्या महिलेनं व्हिडीओ दिला आहे, तो मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम आहे. त्यात इतकी गर्दी आहे की, स्वतः वाट काढत आणि पोलीसही त्यांना पुढे जाण्यासाठी सर्वांना बाजुला करत आहेत, हे दिसतंय. त्यात ती महिलाही आहे. अशावेळी विनयभंगाचा गुन्हा होतो का? हा जनतेच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे.", असंही महेश तपासे म्हणाले.
"राज्यसरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात जितेंद्र आव्हाड हे आवाज उठवत आले आहेत. भूमिका मांडत आले आहेत. त्यामुळे हात लावून कुणाला बाजूला केलं असेल तर तो विनयभंगाचा गुन्हा दाखल होतो का? याची माहिती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी आधी करुन घ्यावी.", असा सल्लाही महेश तपासे यांनी दिला आहे.
दरम्यान, जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करणारी महिला भाजपची पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. ज्या घटनेनंतर महिलेनं जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाची तक्रार दाखल केली तो व्हिडीओ माध्यमांच्या हाती लागला आहे. काल कळवा मुंब्रा पुलाचं उद्घाटन झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड बाहेर पडण्यासाठी निघाले. त्यावेळी वाटेत आलेल्या एका महिलेला त्यांनी बाजूला सारलं. मात्र जितेंद्र आव्हाडांनी ज्या पद्धतीनं बाजूला सारलं त्यावर महिलेनं आक्षेप घेत तक्रार दाखल केली आणि या तक्रारीनंतर आव्हाडांवर कलम 354 नुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
जितेंद्र आव्हाडांवरील विनयभंगाचा आरोप चुकीचा, हेतुपुरस्सर आरोप केले जातायत : अंजली दमानिया