Anjali Damania on Jitendra Awhad Resignation of MLA : जितेंद्र आव्हाडांवरील (Jitendra Awhad) विनयभंगाचा आरोप चुकीचा असल्याचं मत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी व्यक्त केलं आहे. विनयभंग? काय वाट्टेल ते आरोप? असं म्हणत अंजली दमानिया यांनी ट्वीटही केलं आहे. तसेच, जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध मी खूप लढलेय, पण त्यांच्यावरचा हा आरोप अतिशय चुकीचा, असल्याचंही अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे. 


अंजली दमानिया यांनी ट्वीट केलंय की, "विनयभंग? काय वाट्टेल ते आरोप? जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध मी खूप लढले आहे, पण त्यांच्यावरचा हा आरोप अतिशय चुकीचा." 






अंजली दमानिया यांनी यासंदर्भात एबीपी माझाशीही बातचित केली. त्यावेळी त्यांनी जितेंद्र आव्हाडांवरील विनयभंगाचा आरोप चुकीचा असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, हेतुपुरस्सर आरोप केले जात आहेत. हे गलिच्छ राजकारण, असंही अंजली दमानिया म्हणाल्या आहेत. 


अतिशय लाजीरवाणे आरोप आता व्हायला लागलेत : अंजली दमानिया 


एबीपी माझाशी बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या की, "अतिशय लाजीरवाणे आरोप आता व्हायला लागले आहेत. मला सर्वात आधी हे सांगायचंय की, ना राष्ट्रवादीबद्दल काही आस्था आहे, ना जितेंद्र आव्हाडांबद्दल काही आस्था आहे. पण जे चुकीचं आहे, ते चुकीचंच आहे. आज संपूर्ण व्हिडीओ मी पाहिला. एकदा नाही, तर मी 10 वेळा पुन्हा पुन्हा पाहिला. कुठेही विनयभंगासारखी कोणतीही कृती त्यांच्याकडून झालेली नाही. मग विनयभंग, त्यांनी मला अमूक पद्धतीनं हात लावला, असं म्हणणं चुकीचं. हा त्यांच्यावरचा आरोप चुकीचा आहे. हे नक्कीच सर्वांनी पाहिलंय. मी हे ठामपणे सांगतेय."


दरम्यान, जितेंद्र आव्हाडांवर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. मुंब्र्यातील दुकानं बंद करण्यास सुरुवात झाली आहे. तसंच सकाळी रिक्षा देखील बंद करण्यात आल्या होत्या. सकाळी मुंब्रा बायपासवर टायरची जाळपोळ करण्यात आली. तर रात्रीपासून मुंब्रा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरु आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Jitendra Awhad : तक्रारदार महिलेनं मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर गुन्हा दाखल; जितेंद्र आव्हाडांचा दावा